Milk Production Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Production : सांगलीत दूध उत्पादन एक लाख लिटरने घटले

Dairy Business : उन्हाळ्यात उत्पादन घटल्याचे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : जिल्ह्यात तीव्र उन्हाळा, चारा व पाणीटंचाईमुळे दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात दैनंदिन संकलन सरासरी एक लाख लिटरने कमी झाले आहे. उन्हाळ्यात उत्पादन घटल्याचे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते.

जिल्ह्यात शेतीबरोबर पशुपालन हा मोठ्या प्रमाणावर केला जाणारा शेतकऱ्यांचा उद्योग आहे. शेतीचे पैसे वर्षाला येणारे असतात, मात्र जनावरांच्या पैशातून घर चालत असते. त्यामुळे ग्रामीण भागात जनावरांची संख्या मोठी आहे.

जिल्ह्यात सहकारी १७, तर खासगी ७ दूध संघ आहेत. मात्र, दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगावात गेल्या चार महिन्यांपासून चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे

जिल्ह्यात दररोज सुमारे १६ लाख लिटर दूध संकलन होते. यापैकी ५० टक्के पिशवीबंद दुधाची विक्री होते. उर्वरित दुधाची राज्यभरात, तसेच मोठ्या शहरांत निर्यात होते. दूध पावडर व बटर या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठीही वापर होतो. पावसाळ्याच्या चार महिन्यांत हिरवा चारा उपलब्ध असल्याने १० ते १५ टक्के उत्पादन वाढते. मात्र, उन्हाळ्यात उत्पादन घटल्याचे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते.

यावर्षी जानेवारी, फेब्रुवारीत सुमारे १८ लाख लिटर, मार्चमध्ये १७ लाख लिटर व एप्रिल महिन्यात १६ लाख लिटर दैनंदिन दूध उत्पादन झाले आहे. उन्हाळ्यात पाणी व चाराटंचाई जाणवत असल्याने घट झाल्याचे दिसत आहे. नदीकाठावरील चार तालुक्यांत मोठ्या संख्येने दुभती जनावरे व दुधाचा व्यवसाय आहे. दैनंदिन उत्पादनापैकी ६० टक्के दूध गायीचे आहे. यावर्षी तीव्र उन्हाचा परिणाम चाऱ्यावर व दूध उत्पादनावर झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT