Cow Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दूध दराचे उपोषण स्थगित; आंदोलन सुरू राहणार: डॉ. अजित नवले

विविध मागण्यांसाठी दूध उत्पादकांचे सुरू असलेले अन्न त्याग उपोषण ६ व्या दिवशी स्थगित करण्यात आले.

Dhananjay Sanap

विविध मागण्यांसाठी दूध उत्पादकांचे सुरू असलेले अन्न त्याग उपोषण ६ व्या दिवशी स्थगित करण्यात आले. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्याशी फोन चर्चा केली. तसेच दूध दर प्रश्नावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करू आणि हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकरी प्रतिनिधी सोबत बैठक घेऊ अशी आश्वासन डॉ. नवले यांना दिले. तसेच जनसंघर्ष संघटनेचे उपोषणकर्ते संदीप दराडे आणि अंकुश शेटे यांना जिल्हाधिकाऱ्याने दूध दर प्रश्नावर बैठक घेतली जाईल, असे लेखी पत्र दिले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी ६ व्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण स्थगित केले आहे.  

दुधाला दर ३४ रुपये प्रतिलीटरचा दर मिळावा यासह विविध मागण्यांसाठी किसान सभा आणि जनसंघर्ष संघटनेकडून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे अन्नत्याग उपोषण सुरू होते. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दूध दराकडे सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच डॉ. नवले आणि उपोषणकर्त्यांनी तब्येतीसाठी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. तसेच किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दूध प्रश्नावर पशुसंवर्धन मंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यामुळे सर्वांच्या सुचनांचा आदर करून उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले. 

पुढे नवले म्हणाले, "दुधाचे कोसळलेले दर सावरण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सध्या फ्लश सीजन सुरु आहे. या सिजनमध्ये दुधाचे उत्पादन वाढल्याने दुधाचे दर कोसळतात. महिना दोन महिन्याने दुधाच्या  भावाची  लीन सिजनकडे वाटचाल सुरु होईल. या काळात दुधाचे उत्पादन कमी झाल्याने दुधाचे दर आपोआप वाढू लागतात. बैठका व चर्चांमध्ये वेळ वाया घालवून सरकार वेळकाढूपणा करत आहे. दुधाचे भाव आपोआप वाढण्याची वाट पहात आहे. शेतकऱ्यांना गरज आहे तेव्हा मदत न करता आणखी महिनाभराने सरकार अनुदानाचा निर्णय घेणार असेल तर तो शेतकऱ्यांना नव्हे  तर दुध कंपन्यांना लाभदायक ठरणार आहे. तेंव्हा अधिक वेळ वाया न घालवता सरकारने तातडीने दुधाला अनुदान जाहीर करावे व अनुदान दुध कंपन्यांना न देता सरळ शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी यावेळी डॉ. अजित नवले यांनी केली. 

यावेळी सरकारने दुध पावडर निर्यातीला प्रोत्साहन द्यावे अशीही मागणीही किसान सभेने केली आहे. दूध पावडरचा साठा वाढत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात दुध पावडरचे दर कोसळल्याने निर्यात बंद झाली आहे. दूध दर कोसळण्याचे हे एक महत्वाचे कारण सांगितले जात आहे. याकडे सरकारचे लक्ष किसान सभेने वेधले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT