Migration Agrowon
ॲग्रो विशेष

Labour Migration : सातपुड्यातील मजुरांचे स्थलांतर

Labour Wages : खानदेशात केळी व इतर पिकातील तणनियंत्रण, कापूस वेचणी, भाजीपाला पिकांमधील काढणी व इतर कामे आदींसाठी मजुरीचे दर यंदा स्थिर आहेत.

Team Agrowon

Dhule News : खानदेशात केळी व इतर पिकातील तणनियंत्रण, कापूस वेचणी, भाजीपाला पिकांमधील काढणी व इतर कामे आदींसाठी मजुरीचे दर यंदा स्थिर आहेत. काही भागात रब्बी हंगाम नाही. सातपुड्यातील मजुरांनी स्थलांतर केले आहे.

मजुरी दर यंदा स्थिर आहेत. कापूस दरही कमी आहेत. केळी, भाजीपाला उत्पादकही कमी दरांमुळे अडचणीत आहे. सातपुड्यातील मजूर नजीकच्या भागात दाखल झाले असून, निवडणुकीनंतर मजूरटंचाई कमी झाली आहे. मध्यंतरी जळगाव, धुळ्यातील काही गावांत मजुरी दरवाढीसाठी काही मजुरांनी आंदोलन करून प्रशासनाकडे साकडे घातले.

परंतु शेतकरी गेले दोन वर्षे अतिपावसाने संकटात आला. यंदा कापसाचे कमी दर व ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. परिणामी मजुरी दर स्थिर आहेत. नुकसान झाले, पण पीकविमा व इतर भरपाई कुठेही मिळाली नाही. दुसरीकडे उत्पादन खर्च वाढत आहे. मजुरी दर कसे वाढविणार, कारण शेतमालाचे दर गेले दोन वर्षे झपाट्याने घटले आहेत, अशा समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत.

शेतकरी यंदा पावसाने नुकसानीत आहे. गेले दोन वर्षे सुरवातीला दुबार पेरणी आणि नंतर अतिपावसात सर्वच पिके हातची गेली. कापसाचे उत्पादन एकरी बागायतीला पाच व कोरडवाहूसाठी एक क्विंटल एवढेच आले. मका, ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग ही पिके शेतातच अतिपावसात हातची गेली. त्यांची माती झाली. रब्बी पिके फक्त कृत्रीम जलसाठाधारक शेतकरी घेवू शकतात.

काही केळी, कलिंगड व पपई उत्पादक वगळता इतर शेतमालास दर मिळालेच नाहीत. ज्वारीला बाजरीला १८००, मक्याला १६०० रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर मिळाला आहे. आता मका, सोयाबीनचे दर सुधारले, पण सर्वांना त्याचा लाभ दिसत नाही. नैसर्गिक समस्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. त्यात कापसावर गुलाबी बोंड अळी, मक्यावर अमेरिकन लष्करी अळी, अशा समस्या गेले चार ते पाच वर्षे सतत येत आहे. खतांची दरवाढ सुरूच असते. वादळ, गारपीट या समस्यादेखील आ वासून उभ्या असतात. अशात मजुरीचे दर कसे वाढविणार, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरीच कर्जबाजारी होत आहेत, अशी समस्यादेखील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मांडली आहे. हमीभाव फक्त जाहीर होतात, पण ते शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाहीत. शेतकऱ्यांची वित्तीय स्थिती लक्षात घेऊन कुठल्याही मागण्या केल्या पाहिजेत, असा मुद्दा शेतकरी उपस्थित केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT