Migrant Labor Agrowon
ॲग्रो विशेष

Migrant Labor : स्थलांतरित मजूर परतले स्वगृही

Labor Issue : उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक आदिवासी, कातकरी कुटुंबे मुले-बाळे घेऊन काफिल्यासह स्थलांतरित होतात.

Team Agrowon

Kasa News : उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक आदिवासी, कातकरी कुटुंबे मुले-बाळे घेऊन काफिल्यासह स्थलांतरित होतात. कामधंद्यानिर्मित अनेक जण बाहेरगावी जात असतात. मात्र, पावसाला सुरुवात झाली की परत आपल्या गावी रवाना होत असतात. आता डहाणूच्या दुर्गम भागात वसई, भिवंडी, डहाणू, बोईसर, पालघर परिसरातून हजारो कुटुंबे आपल्या मूळ गावी परतण्यास सुरुवात झाली आहे.

तालुक्यातील अनेक दुर्गम भागात रोजगार उपलब्ध नसल्याने दरवर्षी दिवाळी सण झाल्यावर आदिवासी, कातकरी समाजाची हजारो कुटुंबे कामधंद्यासाठी स्थलांतर होतात. त्यात मोठ्या प्रमाणातील तरुण गुजरात वेरावल, पोरबंदर, ओखा, सौराष्ट, मंगरोल आदी भागांत मासेमारी बोटीवर खलासी म्हणून काम करत असतात.

तर काही घोडबंदर, भिवंडी, वसई, विरार, पालघर, बोईसर, डहाणू, चिंचणी, वाणगाव या भागांतील मिठागरे, वीटभट्टी, शेती, बागायती, इमारत बांधकाम, पेंटिग इत्यादी ठिकाणी मोलमजुरी करून राहतात. पावसाळाजवळ आला की, हे मजूर मूळ गावी परतण्यास सुरुवात करतात. आता पावसाला सुरुवात झाल्याने मजूर आपल्या बिऱ्हाडासह घरी जाण्यासाठी निघाले आहेत.

आतापर्यंत कष्ट करून मिळवलेल्या पैशाने ते पावसाळ्यापूर्वी थोडी फार घरदुरुस्ती करतात. तसेच, आठवडा बाजारात जीवनावश्यक साहित्य खरेदी करून ठेवतात. हेच मजूर पावसाळ्याचे चार महिने गावातील शेतकऱ्यांकडे काम करणार आहेत. त्यातून पोटपाणी भागवत पुन्हा दिवाळीनंतर स्थलांतर होणार असल्याचे सोमण कुंभार यांनी सांगितले.

रोजगाराचा प्रश्न गंभीर

उद्योगबंदी असलेल्याने रोजगाराचा प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. सरकार प्रश्न सोडवत नसल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी दरवर्षी येथील स्थलांतर करत असतात, असे मजूर म्हणतात.

दोन-तीन महिन्यांपासून आम्ही शहराकडे काम करत होतो. त्यातून मिळालेल्या पैशातून पावसाळ्यात गावाकडे राहणार आहोत. गावातील सावकाराकडे, शेतकऱ्याकडे मोलमजुरीवर शेतीकाम करणार आहोत. दिवाळी संपली की, पुन्हा कामधंद्यासाठी शहराकडे जाणार आहोत.
- सुरेश गवळी, मजूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT