Microgreens Agrowon
ॲग्रो विशेष

Microgreens : अवघ्या एका आठवड्यात उत्पादन देणारे मायक्रोग्रीन्स

इतर फळे आणि भाजीपाल्याच्या तुलनेत या मायक्रोग्रीन मध्ये अधिक पोषक तत्त्वे असतात.त्यामुळे मायक्रोग्रीनला सुपरफुड मानले जात आहे.

Team Agrowon

बरेच लोक आरोग्य आणि शरिराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांवर अधिक लक्ष देताना दिसत आहेत. त्यामुळे मायक्रोग्रीन या सुपरफूडची (Superfood) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

इतर फळे आणि भाजीपाल्याच्या तुलनेत या मायक्रोग्रीन (Microgreen) मध्ये अधिक पोषक तत्त्वे असतात.त्यामुळे मायक्रोग्रीनला सुपरफुड मानले जात आहे.

कोणत्याही झाडाच्या सुरुवातीची जी कोवळी पाने असतात त्यांना मायक्रोग्रीन म्हणतात. ही पाने दोन ते तीन इंच लांब असतात. या कोवळ्या पानांमध्ये शरिरासाठी अवश्यक असलेली पोषकतत्वे असतात.

दररोज ५० ग्रॅम मायक्रोग्रींन्स सेवन केले तर  शारीरिक पोषणाच्या सर्व गरजा पूर्ण होतात. यासाठी प्रामुख्याने मुळा,मोहरी, यासारख्या झाडांच्या कोवळ्या पानांचा वापर केला जातो.

मायक्रोग्रीनची लागवड कोणत्याही हंगामात करता येत असली तरी हंगामानुसार लागवड करणे फायदेशिर आहे.  मायक्रोग्रीन्सचे चांगले उत्पादन हवामानावर अवलंबून असतं.

कोथिंबीर, मोहरी, कांदा, मुळा, पुदिना, मूग ही पिकं मायक्रोग्रीन म्हणून लागवडीसाठी चांगली असतात. 

मायक्रोग्रीन्स ची लागवड घरच्या घरी करता येते. लागवडीसाठी सेंद्रिय खत किंवा मातीची गरज असते. काही मायक्रोग्रीन्स वाढण्यासाठी मातीची गरज नसते ते पाण्यातही वाढतात.

अशा प्रकारचे मायक्रोग्रीन्स छतावर, बाल्कनीमध्ये आणि बेडरूमध्येही वाढवता येतात, ज्यासाठी दिवसातील सुमारे ३ ते ४ टक्के कोवळा सूर्यप्रकाश पुरेसा असतो.

ज्याठिकाणी पुरेसा सुर्यप्रकाश उपलब्ध नसतो त्याठिकाणी मायक्रोग्रीन लागवडीसाठी फ्लोरोसेंट दिवे देखील वापरतात, त्यामुळे चांगले पीक उत्पादन मिळण्यास मदत होते. 

मायक्रोग्रीन लागवडीसाठी मातीचा ३ ते ४ इंच उंचीचा थर बसेल इतक्या उंचीचे ट्रे निवडावेत. या ट्रेमध्ये मायक्रोग्रीन बी पसरुन मातीच्या पातळ थराने झाकावेत. या ट्रेमधील माती ओलसर ठेवण्यासाठी काळजीपूर्वक पाणी दिल्यास २ ते ३ दिवसात बियाणे उगवते.

अंकुरित बियाणे उन्हात ठेवून दिवसातून २ ते ३ वेळा पाणी शिंपडावे. मायक्रोग्रीन्स आठवड्यात तयार होतात. मायक्रोग्रीन ३ ते ४ इंचांपेक्षा जास्त उंच वाढवता येतात.  त्याचप्रमाणे शेतातही मायक्रोग्रीन्स वाढवता येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT