Jal Jivan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jivan Mission : जलजीवन मिशनच्या कामांबाबत सदस्य आक्रमक

Water Supply Scheme : जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांबाबत गेल्या काही महिन्यांपासून सदस्यांकडून स्थायी समिती व सर्वसधारण सभेत तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही.

Team Agrowon

Nandurbar News : जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांबाबत गेल्या काही महिन्यांपासून सदस्यांकडून स्थायी समिती व सर्वसधारण सभेत तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही.

चुकीच्या कामांना कारणीभूत असलेल्या कार्यकारी अभियंत्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने, स्थायी समितीच्या सभेच्या प्रारंभीच काही सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित करीत विरोधी गटाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा बुधवारी (ता. २५) जिल्हा परिषद सभागृहात अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, शिक्षण सभापती गणेश पराडके, मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार आदींसह जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, भरत गावित, राया मावची, ऐश्‍वर्या रावल, जयश्री पाटील, विजय पराडके आदी उपस्थित होते.

कारवाईचे काय झाले? : पाडवी

सभेच्या सुरवातीलाच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर यांच्याविषयी १ सप्टेंबर २०२३ ला झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठरावानंतरही श्री. बाविस्कर यांच्यावर कारवाईचे काय झाले, असा प्रश्‍न रतन पाडवी यांनी उपस्थित केला. तसेच त्यांच्या कामांविषयी तक्रार करीत नाराजी व्यक्त केली.

सदस्य पुराव्यसह तक्रारी करीत असूनही त्याची दखल न घेता संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रतिप्रश्‍न राया मावची व भरत गावित यांनीही उपस्थित करीत आक्रमक पवित्रा घेतला. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही, उलट त्यांनी २३-२४ सप्टेंबरला जिल्ह्यातील १४८ कामांवर २३ कोटी ५७ लाख ५७ हजार पाचशे ७६ रुपयांची बिले काढली.

त्याबाबतचे पुरावे सभागृहात सदस्यांनी दाखवीत ही बाब लक्षात आणून दिली. तसेच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव सभेत झाला असताना त्याची अंमलबजावणी झालेली नाही, यामागचे कारण काय, असा प्रश्‍न उपस्थित करीत रतन पाडवी, भरत गावित, राया मावची सभात्याग करीत सभागृहातून बाहेर पडले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pragati Award: देवगिरकरांना ‘प्रगती’ पुरस्कार जाहीर; आज वितरण

Fertilizer Management: माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन गरजेचे : डॉ. सुरवसे

Farm Road: पूर्वीचा शेतरस्ता असेल तर नवीन रस्त्याला मंजुरी मिळणार नाही, राज्य सरकारचा निर्णय

Wheat Export India : २५ लाख टन गहू निर्यातीला मंजुरी; शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय, केंद्र सरकारचा दावा

Mulberry Cultivation Registration: मराठवाड्यात ३५४७ एकरांवर तुती नोंदणी

SCROLL FOR NEXT