Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : मेळघाटातील गावांना पाणीटंचाईचे चटके

Water Crisis : उन्हाची दाहकता वाढताच मेळघाटात पाणीटंचाईने डोके वर काढले असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांचीच पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

Team Agrowon

Amarvatai News : उन्हाची दाहकता वाढताच मेळघाटात पाणीटंचाईने डोके वर काढले असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांचीच पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. मार्च अखेरपर्यंत सुमारे २०० गावांना पाणीटंचाईच्या भीषण संकटाला सामोरे जावे लागणार असून दरवर्षीच्या त्याच त्या उपाययोजनांचा पाढा या वेळीसुद्धा वाचण्याची तयारी सुरू आहे.

मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यांत ३५० च्या जवळपास गावे असून अनेक गावे डोंगरउतारावर आहेत. जिल्ह्यात सर्वांत जास्त पाऊस चिखलदरा तालुक्यात पडतो. अनेकदा ८० ते ९० दिवस सूर्य दिसत नाही.

मात्र याच तालुक्यात आदिवासी पाड्यांमध्ये, तांडा-वस्त्यांमध्ये पाण्याची तीव्र पाणीटंचाई उन्हाळ्यात जाणवते. याठिकाणच्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागते. रात्रभर जागून पाणी भरावे लागते, अशी भयावह परिस्थिती उन्हाळ्यात दिसून येते.

यावर प्रशासन मात्र थातूरमातूर उपाययोजना करून वेळ मारून नेते. अधिकारी तात्पुरत्या उपायोजना करतात आणि पुन्हा जैसे-थे परिस्थिती राहते. पाणीटंचाईची भीषणता डोके वर काढत आहे.

खडीमलवासीयांचे हाल

खडीमल गावाचा पाण्याचा प्रश्न देशपातळीवर चर्चेला आला होता. परंतु या गावात अजूनही पाण्याच्या संदर्भात कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. या गावाची लोकसंख्या हजार ते बाराशे असूनसुद्धा पाण्याचा प्रश्न गंभीर स्थितीत आहे.

आदिवासी बांधवांसाठी शेकडो योजना असल्याचे शासनदरबारी सांगण्यात येते, मात्र साधे पाणीसुद्धा या आदिवासी बांधवांच्या नशिबी नाही काय, असा प्रश्न करण्यात येत आहे. खडीमल, माखला, चुनखडी, हातरू, नवलगाव, बिच्छूखेडा, सोनापूर, सलिता, सुमिता, पाचडोंगरी, मोथा यांसह अनेक गावांत तसेच विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा शहरात सुद्ध पाण्याची तीव्र टंचाई असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Procurement Target: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्राने गहू खरेदीचे उद्दिष्ट १५ टक्क्यांनी वाढवले

Dairy Farming Challenges: टंचाईचा फेरा, आधी चारा पेरा

Goda to Narmada Jalyatra: जल चळवळीतील कार्यकर्ते, संस्थांचा विसर

Agriculture Campaigns: खरीप हंगामासाठी राज्यात १८ मोहिमा राबविणार

Climate Resilient Farming: मराठवाड्यात उत्पादकता वाढीसाठी होणार हवामानानुकूल सुधारणा

SCROLL FOR NEXT