Indrayani River Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

River Pollution : इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर पुणे येथे २६ डिसेंबरला बैठक

Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीमध्ये मिसळत असलेले सांडपाणी ही गंभीर समस्या असून त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : इंद्रायणी नदीमध्ये मिसळत असलेले सांडपाणी ही गंभीर समस्या असून त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. हा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायती यासह इतर सर्व प्रशासनासोबत मंगळवारी (ता. २६) पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत नदी प्रदूषण मुक्‍त करण्यावर मंथन होईल व निश्‍चित तोडगा काढला जाईल, असा विश्‍वास मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी (ता. १९) विधान परिषदेत व्यक्‍त केला.

विधान परिषद सदस्या उमा खापरे यांनी या संदर्भाने उपस्थित केलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात ते बोलत होते. श्री. केसरकर म्हणाले की, इंद्रायणी नदी पुणे, पिंपरी चिंचवड, महापालिका तसेच काही ग्रामपंचायतीमधून वाहते. ओढ्याच्या माध्यमातून या शहरी वस्त्यांमधील सांडपाणी नदीत मिसळते. औद्योगिक प्रकल्पातील पाणीही नदीत येते. परंतु हे पाणी एचटीपीच्या माध्यमातून प्रक्रिया केलेले आहे.

शहरी सांडपाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ते डायव्हर्ट करुन एचटीपीमध्ये सोडणे अशा उपाय योजना पहिल्या टप्प्यात केल्या जाणार आहेत. नदीत फेस येत होता. एका कंपनीचे वाशीगचे मोठे युनिट बंद करुन त्यांनाही एचटीपी यंत्रणा बसविण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता नदीत फेस येणार नाही.

लोणावळा, तळेगाव, आळंदी, देहू, देहू कटक मंडळ आणि वडगाव तसेच अनेक ग्रामपंचायती या सर्वांचा एकत्रित प्लॅन तयार करण्यात आला आहे. समिती तयार करता येईल का? याविषयी देखील चाचपणी केली जात आहे.

नदी प्रदूषण मुक्‍तीसाठी निधीची तरतूद देखील करण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. दरम्यान १५ जानेवारी पर्यंत या संदर्भाने योग्य भूमिका घेण्याची सूचना सभापती निलम गोऱ्हे यांनी केली.

खापरे यांनी विचारला प्रश्‍न...

इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानोबाची, अशा ओळी गायल्या जातात. परंतु आता इंद्रायणी प्रचंड प्रदूषित झाली असून तिच्या काठावर थांबणेही दुरापास्त होत आहे. पाण्यावर मोठा प्रदूषित फेस येत आहे, अशा प्रश्‍न उमा खापरे यांनी केला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT