Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : धान खरेदी केंद्राच्या प्रश्‍नावर मुंबईत बैठक

Paddy Procurement Center : नवीन नियम व अटीच्या परिणामी यंदा धान खरेदी प्रभावीत होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर याप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी सोमवारी (ता.३०) मुंबई मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे.

Team Agrowon

Gondia News : नवीन नियम व अटीच्या परिणामी यंदा धान खरेदी प्रभावीत होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर याप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी सोमवारी (ता.३०) मुंबई मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची या बैठकीला उपस्थिती राहणार असून खरेदी केंद्राच्या समस्या यावेळी मार्गी लागतील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

धानाखाली सर्वाधिक क्षेत्र असल्याने गोंदियाला राइस सिटी म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात बहुतांश शेतकरी धानाची लागवड करतात. अनेकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. दरम्यान, यंदा धान पिकाच्या काढणीनंतर शेतकरी बाजारात धान विक्रीसाठी आणत आहेत. परंतू बाजारात धानाला दर कमी असल्याने हमीभाव केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

गोंदिया- भंडारा जिल्ह्यात यंदा ५०० पैकी केवळ ५० केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी एक कोटी रुपयांचे गहाणपत्रक, २० लाख रुपये ठेव, प्रति क्‍विंटलवर एक किलोवरून अर्धा किलो घट देणे तसेच कमिशन ३० रुपयांवरून २० रुपये करण्यात आले आहे. या नव्या जाचक अटी आणि नियमांमुळे अनेक संस्थांनी धान खरेदी केंद्रास नकार दिला आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर ही परिस्थिती उद्भवल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होईल. ही बाब लक्षात घेता याप्रकरणी तोडगा काढण्याची मागणी आमदार विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती.

त्याची दखल घेत सोमवारी (ता.३०) मुंबई मंत्रालयात या विषयावर बैठक बोलावण्यात आली आहे. धान खरेदी केंद्राचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित राहतील. दरम्यान धान खरेदी केंद्रासाठीच्या जाचक अटी रद्द करण्याचे आश्‍वासन मंत्री भुजबळ यांनी आमदार विनोद अग्रवाल यांना दिले आहे. परिणामी ही बैठक सकारात्मक होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT