Adulterated Milk Agrowon
ॲग्रो विशेष

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Milk Update : मौदा तालुक्यातील नागरिकांना शुद्ध दूध मिळण्यासाठी तसेच दुधातील भेसळ बंद करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

Team Agrowon

Nagpur News : दुधातील भेसळीमुळे अनेक जीवघेणे आजार जडण्याची दाट शक्यता बळावली आहे. तेव्हा दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या मौदा तालुक्यातील नागरिकांना शुद्ध दूध मिळण्यासाठी तसेच दुधातील भेसळ बंद करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत मौदा शाखेतर्फे तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

अधिक पैसा कमाविण्याच्या हव्यासापोटी दुधामध्ये युरिया, डिटर्जंट, पाम ऑइल, कॉस्टिक सोडा, बोरिक ॲसिड, आधी पदार्थांचा सर्रास वापर केला जातो. सिंथेटिक भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार केले जात आहेत. भेसळयुक्त दुधाचा दीर्घकाळ वापर केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

पोटाचे विकार, उलट्या, जुलाब, ॲलर्जी, किडनी, हृदयाचे आजार, प्रतिकारशक्ती कमी होणे, कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. कृत्रिम, भेसळयुक्त दूध उत्पादनात गुंतलेल्या व्यावसायिकांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत राष्ट्रीय संघटनेच्या निर्देशानुसार व ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताच्या विशेष पुढाकाराने दूध भेसळीची जबाबदारी निश्चित करावी आणि, ज्या भागात ही भेसळ आढळून येईल, त्या क्षेत्राच्या अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मौदाचे तहसीलदार धनंजय देशमुख यांना देण्यात आले. तुकाराम लुटे, डॉ. नीलिमा घाटोळे, वनिता अंबरते, अर्चना रंगारी, उषा धांडे, मोनाली तुपट आदी कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले.

ग्राहक पंचायतच्या मागण्या

जिल्ह्यात अन्न तपासणी मोबाइल व्हॅन असावी

भेसळ रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करावी

जिल्ह्यात प्रत्येक तहसिल स्तरावर नमुने तपासण्यासाठी प्रशासनाकडून एक ‘मोफत ओपन टेस्टिंग सेंटर’ असावे

जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात अन्न निरीक्षकांची नियुक्ती करावी

प्रशासनाने केलेल्या तपासणीअंती दुधात भेसळीचे प्रमाण आढळून आल्यावर त्याची सोशल मीडिया, वृत्तपत्रे आदींद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT