Mosambi Marketing Agrowon
ॲग्रो विशेष

Mosambi Marketing : मोसंबी फळ खाण्यासंबंधी मार्केटिंग करावे

मोसंबी फळ पिकाचे क्षेत्र वाढत आहे. परंतु अनेक शेतात शास्त्रीय पद्धतीचे अंतर दिसत नाही.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : ‘‘उत्पादन घेणारे शेतकरीच हे फळ पीक खाण्यासाठी उदासीन आहेत. मग या फळ पिकाची मार्केटिंग (Mosambi Marketing) कोण करेल. त्यामुळे सर्व उत्पादकांनी अगोदर हे फळ खाण्याची सवय लावून इतरांना या फळपीक खाण्याचे महत्त्व सांगावे.

त्याशिवाय जास्तीचा भाव (Mosambi Rate) मिळणार नाही. हे फळपीक स्वतः खात मार्केटिंग करा,’’ असा सल्ला फळ संशोधन केंद्राचे डॉ. एम. बी. पाटील. यांनी मोसंबी उत्पादकांना दिला.

पैठण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने गुरुवारी (ता. २) रांजणगाव खुरी (ता. पैठण) येथे मोसंबी उत्पादकांचा मेळावा घेण्यात आला. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, पैठणचे तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे, मंडळ कृषी अधिकारी बिडकीन कातोरे, कृषिभूषण पांडुरंग पाटील इनामे आदी उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘मोसंबी फळ पिकाचे क्षेत्र वाढत आहे. परंतु अनेक शेतात शास्त्रीय पद्धतीचे अंतर दिसत नाही. यामुळेच या पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो व अपेक्षित उत्पादनही येत नाही.

जागतिक पातळीवर चीन देशाचे प्रतिहेक्टरी उत्पादन हे सर्वात जास्त आहे. याचा विचार करता आपण योग्य व्यवस्थापन करत बागा चांगल्या पद्धतीने वाढविल्या पाहिजेत.’’

शिरसाट म्हणाले, ‘‘मोसंबी फळपीक हे या गावाचे महत्त्वाचे फळपीक आहे. मोसंबीवर फळ गळीची मोठी समस्या आहे. शेतकऱ्यांनी शंकेचे निरसन करून घ्यावे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT