Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सह्यांचे अधिकार पुन्हा सभापतींकडे; पणन मंत्र्यांची ठरावाला स्थगिती

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतींच्या सह्यांचे अधिकारांवर गदा आणणारा ठराव करण्यात आला होता. या ठरावाला पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थगिती दिली आहे. यामुळे सभापती दिलीप काळभोर यांच्याकडे सह्यांचे अधिकार देण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सांगितले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिलीप काळभोरे यांच्याकडील सह्यांचे अधिकार काढूण घेणारा ठराव दहा संचालकांनी केला होता. त्याप्रमाणे काळभोरे यांच्याकडून सह्यांचे अधिकार प्रशासनाने काढून घेतले होते. याविरोधात काळभोरे यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले होते.

पण सुनावणी पूर्ण होऊल देखील निकाल राखील ठेवण्यात आला होता. यामुळे सभापती काळभोरे यांनी कलम ४३ अन्वये पणन मंत्र्यांकडे अपील केली होती. त्यावर पनण मंत्र्यांनी ठरावाला अंतरिम स्थगिती दिली. तर अंतिम आदेश येईपर्यंत ही स्थगिती असणार आहे. तर या निर्णयामुळे काळभोर यांच्याकडे पुन्हा सह्यांचे अधिकार आले आहेत.

सभापती काळभोरे समितीच्या कामकाजात इतर संचालकांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप दहा संचालकांनी केला होता. तसेच त्यांच्याकडील सह्यांचे अधिकार काढून अन्य संचालकाकडे देण्याची मागणी केली होती. यानंतर हे प्रकरण पणन संचालक यांच्याकडे गेले होते.

यावर ७ ऑगस्ट रोजी बैठक झाली. या बैठकीत १८ पैकी १० अशा मतांनी ठराव संमत झाला होता. यामुळे पुन्हा एकदा सह्यांचे अधिकार काळभोरे यांच्याकडे गेले होते. मात्र तशी तरतूद नसल्याने हे प्रकरण पुन्हा विभागीय सहनिंबंधकांकडे आले. पण सुनावणी पूर्ण होऊनही निकाल लागला नव्हता. यामुळे सभापती काळभोरे यांनी पनण मंत्र्यांकडे धाव घेत अपील केली होती. त्याला मंत्री सत्तार यांनी अंतरिम स्थगिती दिली.

दहा संचालकांनी केलेल्या ठरावाला पणन मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा सभापतींकडे सह्यांचे अधिकार गेले आहेत. पणन मंत्र्यांच्या आदेशानुसार याची अंमलबजावणी केली जाईल.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

SCROLL FOR NEXT