APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Land Decision : बाजार समित्यांना मिळणार नाममात्र दरात शासकीय जागा

APMC Update : राज्यातील शेतीमालाचा वाढता व्यापार आणि पणन क्षेत्रातील मूल्यवर्धनासाठीच्या पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाने शासकीय जमिनी बाजार समित्यांना नाममात्र १ रुपया दराने देण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील शेतीमालाचा वाढता व्यापार आणि पणन क्षेत्रातील मूल्यवर्धनासाठीच्या पायाभूत सुविधांसाठी बाजार समित्यांकडून जागांची मागणी वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने शासकीय जमिनी बाजार समित्यांना नाममात्र १ रुपया दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या जागांच्या वापरातून गाळे आणि व्यावसायिक वापर केला तर, होणाऱ्या व्यवसायातील ५० टक्के रक्कम शासनाला द्यावी लागणार असल्याची अट शासनाने टाकली आहे. तर अकृषिक आकारणीतून सूट देऊ नये अशी अट देखील टाकली आहे.

बाजार समित्यांमधील पारंपरिक शेतीमाल विक्री व्यवस्था आता, पणन सुधारणांमुळे बाजार आवार अत्याधुनिक होण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये शेतीमाल हाताळणीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि मूल्यवर्धनासाठी शीतगृहे, प्रतवारी केंद्रे, पॅकहाऊस आदी सुविधा बाजार समित्यांमध्ये उभारण्यासाठी वाढीव जागांची मागणी वाढत आहे.

जागांच्या खरेदीसाठी बाजार समित्यांकडे मुबलक पैसे नसल्याने शासकीय जागांची मागणी वाढली होती. यानुसार विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन, शासनाने बाजार समित्यांना नाममात्र दरात जागा देण्यास मान्यता दिली आहे. मात्र या जागांच्या वापरातून गाळे आणि व्यावसायिक वापर केला तर, होणाऱ्या व्यवसायातील ५० टक्के रक्कम शासनाला द्यावी लागणार असल्याची अट शासनाने टाकली आहे. तर अकृषिक आकारणीतून सूट देऊ नये अशी अट देखील टाकली आहे.

जुन्नर बाजार समितीचे जागा खरेदी प्रकरण चर्चेत

जुन्नर (जि. पुणे) बाजार समितीची ११ एकर जमीन ३० कोटी रुपयांना खरेदी करण्याचे प्रकरण नुकतेच चर्चेत आले होते. नव्या निर्णयामुळे समितीला शासकीय जमीन नाममात्र दरात मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

जमीन खरेदीचा प्रस्ताव बारगळणार

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारासाठी यशवंत सहकारी कारखान्याच्या ११७ एकर जमीन खरेदीचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर आहे. ही जागा खरेदीसाठी किमान ५०० कोटी रुपयांची गरज आहे. नव्या निर्णयामुळे प्रस्ताव बारगळण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Dam Outflow : कोयनासह प्रमुख धरणांतून विसर्गात घट

Students Protest: झेन अल्फांनी वाकवले जिल्हा परिषद प्रशासन

Crop Insurance : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत सहभाग

Kharif Sowing Update: धाराशिवमध्ये खरीप पेरण्या ८८ टक्क्यांवर; टक्केवारी घसरली तरी सोयाबीनसह पिकांची जोमदार वाढ

Ring Road Project : रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT