APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Strike : पुण्यासह जिल्ह्यातील बाजार समित्या बंद

APMC Act : पुणे बाजार समितीमधील अडते आणि कामगार संघटनांनी बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने बाजार आवारात शुकशुकाट होता.

Team Agrowon

Pune News : पणन सुधारणांच्या २०१८ च्या विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्य बाजार समिती संघाने पुकारलेल्या बाजार समिती बंदमध्ये सोमवारी (ता.२६) पुणे बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सहभागी झाल्याने शेतमाल खरेदी विक्री ठप्प झाली होती. पुणे बाजार समितीमधील अडते आणि कामगार संघटनांनी बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने बाजार आवारात शुकशुकाट होता.

पुणे बाजार समितीसह जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, इंदापूर, दौंड, बारामती, नीरा (सासवड) भोर या बाजार समित्या बंद होत्या. जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने व्यवहार ठप्प झाले होते.

बंदमध्ये अडते असोसिएशन सहभागी झाल्याचे अध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक अनिरुद्ध भोसले आणि श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील (Chhatrapati Shivaji Market Yard) कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे (Santosh Nangare) यांनी दिली.

माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी माथाडी विधेयक मांडण्यात आलेले आहे. संबंधित विधेयक मागे घेण्यात यावे. माथाडी मंडळात कामगारांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी, तसेच लोकशाही पद्धतीने व्यवस्थित बाजार समित्या सुरू आहेत. त्यांचे केंद्रीकरण करण्याची गरज नसल्याचे कामगार संघटनांकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT