APMC Election Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Election: कोट्यावधींची उलाढाल असलेल्या दोन बाजारसमित्यांच्या निवडणुका लांबणीवर

Market Committee Election Update : राज्यात मागच्या काही महिन्यांपासून बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगरमधील बाजारसमित्यांच्या निवडणुका पार पडल्या.

Team Agrowon

Solapur Apmc Update : राज्यात मागच्या काही महिन्यांपासून बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगरमधील बाजारसमित्यांच्या निवडणुका पार पडल्या.

दरम्यान अद्यापही काही जिल्ह्यातील निवडणुका होणे बाकी आहे. परंतु या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत.

पणन विभागाच्या सहसंचालकांनी गुरूवारी (ता. १५) यासंदर्भातील आदेश काढला. त्यानुसार सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

निवडणुकीचा कालावधी पावसाळ्यात येत असल्याचे कारण त्यासाठी दिले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आहेत तर बार्शीच्या बाजार समितीची सत्ता भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे आहे.

सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. पणन सहसंचालकांच्या आदेशानुसार २७ जानेवारी २०२४ पर्यंत या बाजार समित्यांचे संचालक मंडळ कायम राहणार आहे.

जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अहवालाचा आधार घेऊन मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, शासनाने आमच्या कामकाजाची दखल घेत आम्हाला मुदतवाढ दिलेली आहे, त्यामुळे आम्ही समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया सोलापूरबाजारसमितीचे उपसभापती श्रीशैल्य नरोळे यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT