Farmer Agitation Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Agitation : ‘सिफा’च्या १८ ठरावांच्या अंमलबजावणीसाठी मोर्चा

Implementation of Resolutions : शेतकरी संघटनांच्या राष्ट्रीय परिषदेत (सिफा) केलेल्या १८ ठरावांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांवर गुरूवारी (ता. २९) मोर्चा काढत ठरावांची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली.

Team Agrowon

Pune News : शेतकरी संघटनांच्या राष्ट्रीय परिषदेत (सिफा) केलेल्या १८ ठरावांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांवर गुरूवारी (ता. २९) मोर्चा काढत ठरावांची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली.

पुण्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजी नांदखिले यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटनेने मोर्चा काढला. या वेळी विविध तालुक्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये पांडुरंग रायते, बाळासाहेब घाडगे, भाऊ दौंडकर, बाबासाहेब हरगुडे, दीपक हरगुडे पाटील, राजू पाटील ढमढेरे, सुनील नातू , पंढरीनाथ रसाळ पाटील, तुकाराम निंबाळकर, हणमंत वीर, सतीश देशमुख आदी उपस्थित होते.

...असे आहेत ठराव

- कृषी निविष्ठांवरिल जीएसटी रद्द करून उत्पादन खर्चात बचत करा

- कापूस खरेदीवरील जीएसटीचा बोजा शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीत नसावा

- शेतीतील मजूर समस्येवर मात करण्यासाठी ‘मनरेगा’चा ८० टक्के निधी शेतातील कामांसाठीच्या मजुरीसाठी असावा

- नाशिवंत उत्पादनांसह सर्व कृषी उत्पनांना, पिकांना ‘एमएसपी’ द्यावा. नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीमुळे ‘एमएसपी’त वाढ करावी

- सरकारने शेतीमाल खरेदीची खात्री करावी. शेतीमालाची रक्कम व्यापाऱ्यांनी तत्काळ द्यावी

- आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय शेतीमाल पुरवठ्याबाबत विश्‍वासार्हता वाढीसाठी सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी कायमची हटवावी

- तेलबियांसह इतर शेतीमालावर आयातशुल्क लावावे

- शेतकऱ्याला विमा कंपनी निवडण्याचा पर्याय द्यावा. सरकारने विमा कंपन्यानिहाय, जिल्हानिहाय निश्‍चित करू नयेत.

- पीक नुकसानीच्या मूल्यांकनासाठी, वैयक्तिक शेतकरी वैयक्तिक युनिट हे मूल्यांकनाचे एकक मानावे

- पीक नुकसानीच्या टक्केवारीचे मूल्यांकनासाठी मूल्यांकन समितीमध्ये कृषी अधिकाऱ्याचा समावेश असावा

- बंद पडलेले ऊस कारखाने पुन्हा सुरू करावेत

- दोन ऊस कारखान्यांमधील हवाई अंतराची बंधने काढून टाकावे

- अवनावश्यक वस्तू कायद्यातून साखर काढून टाका

- विद्यमान कृषिकर्ज माफ करावे

- नाबार्ड, एफसीआय या संस्थांना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या छत्राखाली आणावे

- जीएम बियाण्यांच्या वापरावर लादलेले निर्बंध उठवावेत

- वन्य प्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात नुकसान टाळण्यासाठी आणि उपाययोजनांसाठी समिती स्थापन करावी

- कृषी यंत्रांना छापील किंमत लागू करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT