Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Crisis : मराठवाड्यातील २४ लघू प्रकल्प कोरडे

Water Storage Decline : मराठवाड्यातील पाणीसाठा सपाट्याने घटत चालला आहे. त्याचा थेट परिणाम लघू प्रकल्पांवर प्रामुख्याने दिसून येतो आहे. तब्बल १६६ लघू प्रकल्पातून पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील एकूण ७५१ लघू प्रकल्पांपैकी २४ प्रकल्प कोरडे पडले आहेत. यामध्ये बीड व धाराशिवमधील प्रत्येकी ७, लातूर व जालन्यातील प्रत्येकी ३, हिंगोलीतील चार प्रकल्पांचा समावेश आहे. मराठवाड्यातील पाणीसाठा सपाट्याने घटत चालला आहे. त्याचा थेट परिणाम लघू प्रकल्पांवर प्रामुख्याने दिसून येतो आहे. तब्बल १६६ लघू प्रकल्पातून पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या लघू प्रकल्पात जालन्यातील २३, बीडमधील ४६, लातूरमधील ७, धाराशिवमधील ४६ नांदेडमधील २३, परभणीतील ११ व हिंगोलीतील १० लघू प्रकल्पांच्या समावेश आहे. तब्बल २५५ लघू प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध असून, २१२ लघू प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, ५४ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, तर केवळ ३० प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

७ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली

मराठवाड्यातील एकूण ७५ मध्यम प्रकल्पांपैकी सात प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये नांदेड, धाराशिव, बीडमधील प्रत्येकी दोन, तर जालन्यातील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. २९ मध्यम प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध असून, ३३ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के दरम्यान पाच प्रकल्पांत ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान, तर छत्रपती संभाजीनगरमधील केवळ एका प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे.

दोन मोठ्या प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी बीड व धाराशिव नदीला प्रत्येकी एका प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे दुसरीकडे पाच मोठ्या प्रकल्पात २५ ते ५० टक्क्यांदरम्यान चार प्रकल्पांत ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा शिल्लक, असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

८७९ प्रकल्पांत ३६ टक्के उपयुक्त पाणी

मराठवाड्यातील एकूण ८७९ मोठ्या, मध्यम, लघू, प्रकल्पांसह गोदावरी तसेच तेरणा, मांजरा, तेरेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये ३०.९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पात ४६ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात २९ टक्के ७५१ लघूकल्पांत २२ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २६ टक्के, तेरणा मांजरा रेणा नदीवरील २७ मंधारात ८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT