Manoj Jarange Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज रस्त्यावर

Marathi reservation : मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून (ता. २५) अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धार वाढू लागली आहे.

Team Agrowon

Maharashtra News : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेले उपोषण गुरुवारी (ता. २६) दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये श्री. जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ विविध माध्यमातून पाठिंबाही सुरूच आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला अनेक गावांमध्य पुढाऱ्यांना गावबंदीचे फलक लागले आहेत. तसेच अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांचे साखळी उपोषण सुरू आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी याआधी २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. थेट मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाविषयी सरकार सकारात्मक असून वेळेची मागणी करत उपोषण सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार उपोषण मागे घेत श्री. जरांगे यांनी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला होता. या वेळेत मराठा आरक्षणाविषयी सरकारकडून ठोस निर्णय न झाल्याने बुधवारपासून (ता. २५) जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे अन्न, जल त्याग बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

त्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली. या वेळी शेळके यांनी शासन आपल्या मागणीवर गांभीर्याने विचार करत आहे. आपण बेमुदत उपोषण थांबवा म्हणून लेखी पत्र देत विनंती केली. या वेळी जरांगे पाटील यांनी सांगितले, की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण मागे घेतले जाणार नाही.

जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर मराठवाड्याच्या विविध भागांत जरांगे यांच्या मागणी व उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधवांच्या वतीने ठिय्या आंदोलन, कुठे टॉवरवर चढून आंदोलन, कुठे साखळी उपोषण, कुठे राजीनामे देण्याची प्रक्रिया आदी मार्गाने आंदोलने करण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यासह राज्यात सर्वच पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Budget for Farmer 2026 : शेतकऱ्यांसाठी 'भारत-विस्तार एआय टूल', अर्थमंत्र्यांची घोषणा; नारळ, काजू आणि चंदन उत्पादकांसाठी घोषणा

Textile Industry: कापूस उद्योगासाठी मोठी घोषणा; वस्त्रोद्योगासाठी सर्वसमावेशक ५ कलमी कार्यक्रम जाहीर

Cultural Economy: निसर्गप्रधान जीवनशैली व सांस्कृतिक-अर्थकारण

National Waterways: पुढील पाच वर्षात २० राष्ट्रीय जलमार्ग सुरु करणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

Grass lands: गवताळ राने जपणे गरजेचे

SCROLL FOR NEXT