Maratha Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटी येथील सभेसाठी मराठा समाज बांधव सरसावले

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. १४) अंतरवाली सराटी, ता. अंबड येथे होत असलेल्या विराट सभेच्या नियोजनासाठी मराठा समाज बांधव मैदानात उतरले असून, या सभेचे नियोजन करत आहेत.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. १४) अंतरवाली सराटी, ता. अंबड येथे होत असलेल्या विराट सभेच्या नियोजनासाठी मराठा समाज बांधव मैदानात उतरले असून, या सभेचे नियोजन करत आहेत.

राज्याच्या दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे पाटील यांचे गुरुवारी (ता.१२) पहाटे साडेतीन वाजता अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी आगमन झाले. यावेळी त्यांचे महिलांनी रांगोळी, फुले व औक्षण करून जोरदार स्वागत केले. पैठण, नवगाव, विहामांडवा, भंबेरी, नालेवाडी मार्गे जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे आगमन झाले.

प्राथमिक शाळा ते उपोषण स्थळापर्यंत जरांगे यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. शनिवारी (ता. १४) न भुतो न भविष्यती अशी विराट सभा येथे होत असल्याने गावातील नागरिकांसह भागातील गावाचे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. सभेच्या तयारीला वेग आला आहे. वडीगोद्री- रामगव्हाण, अंतरवाली सराटी- रामगव्हाण या मार्गावर अंतरवाली येथे शंभर ते दीडशे एकर जमिनीवर होत असलेल्या सभास्थळी सध्या कामाला वेग आला आहे.

सभेचे व्यासपीठ, वाहनांसाठी पार्किंग, आसन व्यवस्था, सभास्थळी येण्यासाठी रस्ता दुरुस्ती, पाण्याचे नियोजन, विविध स्टॉलसाठी जागा निश्‍चित करणे, झेंडे, बॅनर तयार करणे, वीजपुरवठा, साउंड सिस्टिम आदी कामाला वेग आला आहे. यासाठी समाज बांधवही तितकेच उत्साहात सहभागी होऊन दिलेली जबाबदारी पार पाडत आहे.

सभास्थळी झेंडे तयार करुण सभेच्या ठिकाणी, परिसरात रस्तावर लावण्याची तयारी सुरू आहे. वडीगोद्री, अंतरवाली सराटी, रामगव्हाण, टाका आदी मुख्य रस्त्यावर दुरुस्ती व साफसफाई करुण धुळीपासून संरक्षण व्हावे करिता पाणी मारले जात आहे.

दोडडगाव येथे पुन्हा चाळीस एकर जमिनीवर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी (ता. १२) मनोज जरांगे व सहकारी यांनी सभास्थळी येऊन कामकाजाची पाहणी केली व काही सूचना व मार्गदर्शन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT