Manoj Jarange Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange : सरकार आरक्षणाला जाणूनबुजून वेळ लावतेय ; मनोज जरांगे यांचा आरोप

Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्यावतीने आणखी मुदत वाढ मागत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.

Team Agrowon

Jalna News : ‘‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, आरक्षणासाठी ४० दिवस दिले तरीही वेळ वाढवून मागता. शासन जाणून बुजून वेळ लावत आहे. बैठका घेत आहे. इंटरनेट सेवा बंद करून व गुन्हे दाखल करून तुम्ही मराठा समाजाचा आवाज दाबू शकत नाही,’’ असे मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (ता.१ ) अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्री. जरांगे म्हणाले, ‘‘जेव्हा वेळ वाढवून दिला तेव्हाही सर्वपक्षीय बैठक झाली होती. शासनाला वेळ वाढवून कशासाठी पाहिजे, हे समोर येऊन बसून आम्हाला सांगावे. वेळ वाढीसाठी समाज तयार झाला तर विचार करू. या बाबत शासनाने सविस्तर सांगावे. सर्वपक्षीय नेते हे एकच आहेत. फक्त त्यांचे पक्ष वेगळे आहेत.’’

‘‘राज्यात वातावरण खराब करण्याचे काम शासन करत आहे. आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. शांततेतच आंदोलन होणार आहे. शासनावर विश्वास कसा ठेवायचा. आरक्षण देत नाही. मी बोललो तर म्हणतात आम्हाला बोलत नाही.

मला बोलता येते तोपर्यंत समोर येऊन चर्चा करा. तुम्हाला समाज अडवणार नाही. चर्चा फक्त एकदाच होईल. समाजाला पटले तर वेळ वाढवून देऊ. आंदोलन थांबणार नाही,’’ असे श्री. जरांगे यांनी स्पष्ट केले.

‘...अन्यथा आंदोलन पेलणार नाही’

‘‘मराठा समाज आमच्याबरोबर आहे. शासनाने विशेष अधिवेशन बोलवावे. अधिवेशन न बोलविल्यास पाणीसुद्धा घेणार नाही. तिसऱ्या टप्प्यातील शांततेतील आंदोलन शासनास पेलणार नाही.

राज्यात सरसकट मराठा समाजाला ओबीसीमधूनच कुणबी प्रमाणपत्र द्या, अर्धवट आरक्षण मान्य नाही. आरक्षण मिळेपर्यंत अंतरवाली सराटी येथील उपोषण, आंदोलन थांबणार नाही,’’ असेही श्री. जरांगे-पाटील यांनी ठामपणे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT