Manmad APMC Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Fee Dispute : मनमाड बाजार समिती शुल्कावरून बेमुदत बंद

Traders Protest : बाजार समितीमध्ये आकारले जाणारे बाजार समिती शुल्क १ रुपयावरून ७५ पैसे करण्यात यावे, या मागणीसाठी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : बाजार समितीमध्ये आकारले जाणारे बाजार समिती शुल्क १ रुपयावरून ७५ पैसे करण्यात यावे, या मागणीसाठी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. मंगळवार (ता.१४)पासून संप सुरू झाल्यामुळे लिलाव ठप्प झाले. परिणामी, व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतीमाल विक्री करताना शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.

नांदगाव तालुक्याच्या पश्‍चिम भागात असलेली मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाते. येथे व्यापाऱ्यांकडून १ रुपया बाजार शुल्क आकारले जात होते. हे शुल्क एक रुपयावरून ७५ पैसे करण्याची मागणी व्यापाऱ्यांची असून, याबाबत बाजार समितीला पत्र देण्यात आले आहे.

७५ पैसे बाजार शुल्क परवडणारा नसल्याने बाजार समितीने १ रुपया कायम ठेवले होते. मात्र व्यापारी वर्गाने पत्र दिल्याने बाजार समितीच्या कार्यकारी मंडळाने १ जानेवारीपासून एक रुपयाऐवजी ९० पैसे शुल्क केले. मात्र व्यापारी मागणीवर ठाम असल्याने त्यांनी संप पुकारला आहे.

शेतकऱ्यांची कोंडी

व्यापाऱ्यांनी पत्र देत बाजार शुल्क १ रुपयावरून ७५ पैसे करण्याची मागणी केली होती. त्यानुसार १ जानेवारीपासून १० पैसे कमी करून बाजार समिती फी ९० पैसे केली. मात्र मागणी मान्य न केल्याने व्यापाऱ्यांनी संप पुकारला. येथे खरीप कांद्याची आवक होते. मात्र काढणीपश्‍चात या कांद्याची टिकवणक्षमता कमी आहे. त्यातच बाजार समितीत लिलाव ठप्प झाल्याने शेतीमाल विक्रीची अडचण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बाजार समितीच्या आर्थिक परिस्थितीनुसार १० पैसे बाजार शुल्क कमी करण्यात आले होते. त्याचे काय परिणाम होतात हे अभ्यासले जाणार होते; मात्र व्यापाऱ्यांनी हा निर्णय विचारात घेतलेला नाही. आश्‍वासन देऊनही व्यापाऱ्यांनीही आडमुठी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे लिलाव कामकाज बंद करण्याचा निर्णय हा शेतकरी हिताचा नाही.
दीपक गोगड, सभापती, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT