Kandhari Bull Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Competition : मांजरमचा लाल कंधारी वळू, हासूळची गाय ठरली चॅम्पियन!

Bull and Cow Champions : माळेगाव यात्रेत जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत लाल कंधारी वळूमध्ये मांजरम (ता. नायगाव) येथील पशुपालक श्रीपती देवराव शिंदे यांचा वळू माळेगाव चॅम्पियन तर सुमीत्रा रामेश्‍वर सूर्यकांबळे यांची देवणी गाय माळेगाव चॅम्पियन ठरली आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : माळेगाव यात्रेत जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत लाल कंधारी वळूमध्ये मांजरम (ता. नायगाव) येथील पशुपालक श्रीपती देवराव शिंदे यांचा वळू माळेगाव चॅम्पियन तर सुमीत्रा रामेश्‍वर सूर्यकांबळे यांची देवणी गाय माळेगाव चॅम्पियन ठरली आहे. यांना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते लाल कंधारी वळू पालकास एक लाख रुपये तर गाय पालकास रुपये ५० हजारांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्रीक्षेत्र माळेगाव येथे रविवारी (ता. ५) पशू, अश्व, श्‍वान, शेळी, कुक्कुट प्रदर्शन व दुग्ध स्पर्धेचे निकाल जाहीर झाले. बक्षीस वितरण आमदार प्रताप चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, यात्रा सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले,

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, गटविकास अधिकारी दशरथ आडेराघो, सरपंच प्रतिनिधी हनमंत धुळगंडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, पोलिस निरीक्षक संजय निरपत्रेवार, डॉ. सुनील गिरी, डॉ. निरंजन बागल, डॉ. उपेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील बक्षीस वितरण करण्यात आले.

या स्पर्धेत लालकंधारी वळूमध्ये नायगाव तालुक्यातील माजंरम येथील पशुपालक श्रीपती देवराव शिंदे यांचा वळू माळेगाव चॅम्पियन तर सुमीत्रा रामेश्‍वर सुर्यकांबळे यांची देवणी गाय माळेगाव चॅम्पियन ठरली आहे. या दोन्ही पशुपालकांना अनुक्रमे लालकंधारी वळू पालकास एक लाख रुपये तर गाय पालकास रुपये ५० हजारांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वेळी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धतील विजेत्यांना यावेळी रोख रक्कम व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा फड आणि अश्व शर्यतही माळेगाव येथे पार पडली.

दीप कागणेने जिंकली मानाची कुस्ती

माळेगाव येथील कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती माळाकोळी (ता.लोहा) येथील दीप रविदास कागणे या पहेलवानाने जिंकली. त्यांनी पालम येथील राम तेलंगेची पाठ टेकवली. नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण,

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, श्याम दरक, एकनाथ मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे, माजी शिक्षण सभापती संजय कऱ्हाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोसीकर आदी उपस्थित होते. माळेगाव येथील आखाड्यावर झालेल्या कुस्ती दंगलीमध्ये नांदेड जिल्ह्यासह लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोलीसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील पहिलवानांनी हजेरी लावली. लाखो यात्रेकरूंच्या साक्षीने हलगीच्या तालावर अनेक पैलवानांनी आपापल्या डावपेचाद्वारे प्रतिस्पर्धी पैलवानांना चांगलीच पकड दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT