Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Season : सातपुड्यातील आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Market : खानदेशात सातपुड्यातील आंबा प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी देखील आंबा पीक वाढले आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात सातपुड्यातील आंबा प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी देखील आंबा पीक वाढले आहे. या भागातील हंगाम आता अंतिम स्थितीत आहे. यंदा नैसर्गिक फटकाही या फळ पिकास बसला आहे.

खानदेशात नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांत सातपुड्यात आंबा पीक व बागा आहेत. सातपुड्यातील अनेक वृक्ष स्थानिक गट, प्रशासनाकडे आहेत. तर काही शेतकऱ्यांनीदेखील आंबा बागा फुलविल्या आहेत. यात केसर, देशी व अन्य आंबा आहे.

सर्वाधिक बागा व वृक्ष नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा, शहादा, धडगाव भागात आहेत. कृषी विभागानुसार सुमारे १६० हेक्टरवर नंदुरबार जिल्ह्यातील विविध तालुक्यांत आंबा बागा आहेत. तर सातपुड्यातही मोठे क्षेत्र आहे.

तळोदा तालुक्यातील अनेक शेतकरी आंबा पिकाकडे वळले आहेत. त्यात एकट्या तळोद्यात २० टक्के आंबा पीक आहे. यातील प्रतापपूर, गोपाळपूर, रांझणी आदी भागात आंबा बागा शेतकऱ्यांनी फुलविल्या आहेत. स्थानिक वाण व केसर आंबाही या भागात आहे. केसर आंब्याचे पारंपरिक वाण सातपुड्यातील आहे.

त्याचे कलम तयार न करता त्याचा प्रसार झाला असून, गोडवा व सुवास यासाठी हा आंबा प्रसिद्ध आहे. त्यास जिल्हाभर मोठी मागणी असते. खानदेशात एकूण अडीच हजार हेक्टरवर आंबा बागा आहेत. त्यात बांधावरील झाडे व सातपुड्यातील विखुरलेल्या वृक्षांचा समावेश नाही.

धडगाव भागातही देशी व केसर आंबा आहे. नंदुरबारातील शिरपूर भागात काही क्षेत्रात आंबा पीक आहे. तर जळगावात यावल, मुक्ताईनगर व रावेर भागात सातपुड्यात हे पीक आहे. या पिकास यंदा वादळाचा मोठा फटका बसला आहे. मार्च ते मे या कालावधीत चार - पाच वेळेस वादळी पाऊस, गारपीट अशी समस्या होती. यामुळे पिकाची सतत हानी झाली. अक्षय तृतीयेनंतर सातपुड्यातील आंबा बाजारात आला. सुमारे दीड महिना हा हंगाम असतो. परंतु यंदा १० ते १२ दिवस लवकर सातपुड्यातील आंबा हंगाम संपुष्टात येईल, असे दिसत आहे.

गुजरात, मध्य प्रदेशात मागणी

नंदुरबारातील आंब्यास गुजरात, मध्य प्रदेशात मागणी असते. या भागात आंब्याची मोठी उलाढाल आहे. तर जळगाव जिल्ह्यातही काहीशी उलाढाल होत असते. तुलनेत नंदुरबारातील आंबा अधिकचा परराज्यांत पाठविला जातो, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT