Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : पावसाच्या सरींनी आंबा, काजू बागायतदार धास्तावले

Crop Damage : दरम्यान, पहाटे देखील काही भागात छिडकावा झाला असून, जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्हयाच्या काही भागात शुक्रवारी (ता.२९) उशिरा पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान, पहाटे देखील काही भागात छिडकावा झाला असून, जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने आज (ता.३०) हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे.

जिल्ह्यात शुक्रवार सकाळपासून पावसाचे वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती. परंतु दिवसभर कुठेही पाऊस पडला नाही. मात्र रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग तालुक्याच्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्या.

सावंतवाडी पावसाचे प्रमाण अधिक होते. याशिवाय कणकवली, वैभववाडीच्या पूर्वपट्ट्यात पावसाचा छिडकावा झाला. दरम्यान, शनिवारी (ता.३०) सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. उन्हाची तिव्रता वाढली असून अंगाची लाही लाही होत आहे.

ढगाळ वातावरण आणि काही भागात पडलेल्या पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. नियमित आंबा हंगाम ऐन तोंडावर असताना वातावरणात प्रचंड बदल झाला असल्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.

काजू बागायतदारांची देखील तीच स्थिती आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. मात्र वातावरण ढगाळ राहणार असल्याचे स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT