Revenue Department Agrowon
ॲग्रो विशेष

Talathi Office : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी दुपारनंतर कार्यालय, सज्जात हजर राहावे

Revenue Department : बैठका आणि दौऱ्याचे निमित्त काढून कार्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना चाप लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Team Agrowon

Pune News : बैठका आणि दौऱ्याचे निमित्त काढून कार्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना चाप लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे सकाळच्या सत्रातच बैठका घेण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीनंतर तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना आपल्या सज्जा, कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे.

तलाठ्यांनी सज्जात उपस्थित राहावे, असे परिपत्रक महसूल विभागाने याआधी काढले होते. मात्र, बैठकांच्या नावाखाली दिवसभर तलाठी आणि मंडल अधिकारी अनुपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बैठकांच्या आयोजनाबाबत आता महसूल विभागाने परिपत्रक काढले आहे.

तलाठी व मंडल अधिकारी हे क्षेत्रीय स्तरावरील सामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे पद आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना या दोन्ही पदांवरील व्यक्तींचा अनुभव फारसा चांगला नाही. अनेकदा तलाठी सज्जात उपस्थित नसतात.

पिकांची ‘ई पीक पाहणी’ या मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करणे, नुकसानीचे पंचनामे करणे, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती या प्रसंगात तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचे काम महत्त्वाचे असते. मात्र, अनेकदा या दोनही पदांवरील व्यक्ती भेटत नाहीत हा अनुभव आहे. याबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून महसूल विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

जिल्हाधिकारी, उपविभागीय आणि तहसील कार्यालयांत बैठका सकाळच्या सत्रात घेण्याचे निर्देश परिपत्रकाद्वारे दिले आहेत. त्या बैठकीनंतर तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी दुपारी आपल्या कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या सर्व विभाग प्रमुख आणि कार्यालयीन प्रमुखांना निर्देश द्यावेत, असेही सूचित केले आहे.

बैठकांच्या नावाखाली गैरहजेरी भोवणार

मागील वर्षी ऑगस्टमध्ये तलाठ्यांनी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहावे, अशा सूचना महसूल विभागाने दिल्या होत्या. मात्र, त्या सूचनांनाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. अनेकदा तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयांत बैठकांस उपस्थित राहण्यासाठी तलाठी आणि मंडल अधिकारी सकाळपासून त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचेही समोर आले आहे. बैठकांच्या नावाखाली हे कर्मचारी दिवसभर सज्जाकडे फिरकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात.

थोडक्यात महत्त्वाचे...

- सज्जा, कार्यालयातील गैरहजेरीबाबत महसूल विभागाला तक्रारी प्राप्त

- जिल्हाधिकारी, उपविभागीय आणि तहसील कार्यालयांत बैठका सकाळच्या सत्रात होणार

- बैठक झाल्यावर दुपारनंतर कार्यालयात हजर राहावे लागणार

- आता बैठकांच्या नावाखाली कार्यालयात गैरहजर राहता येणार नाही

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT