Mandalik Sugar Ethanol agrowon
ॲग्रो विशेष

Mandalik Sugar Ethanol : मंडलिक साखर कारखान्यास इथेनॉल उत्पादनास परवानगी; माजी खासदार संजय मंडलिक यांची माहिती

Mandlik Sugar Factory : कागल तालुक्यातील हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यास इथेनॉल उत्पादन करण्यास परवानगी मिळाली आहे.

sandeep Shirguppe

Mandlik Sugar Ethanol Production : कागल तालुक्यातील हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यास इथेनॉल उत्पादन करण्यास परवानगी मिळाली आहे. पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटन (पेसो) मुंबई यांच्याकडून डिस्टीलरी प्रकल्पातून ही परवानगी देण्यात आली. याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी शुक्रवारी(ता.१५) पत्रकार परिषदे द्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे की, ‘पेसो’कडून कारखान्याला ८ नोव्हेंबर रोजी मंजुरी पत्र मिळाले आहे. कारखान्याचा डिस्टीलरी प्रकल्प सन २०२१-२२ मध्ये सुरू झाला आहे. प्रकल्पामधून रेक्टीफाईड स्पिरीट व एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलचे (इएनए) उत्पादन घेतले जात होते.

तथापि, केंद्र शासनाच्या धोरणामुळे बी हेवी व सिरपपासून स्पिरीट उत्पादनास बंदी घातल्यामुळे स्पिरीट व इएनएचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने त्याला अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे कारखान्याने इथेनॉल उत्पादनावर भर दिला होता. शासनाकडून परवानगी मिळाल्याने येत्या हंगामापासून इथेनॉल उत्पादनास सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, संचालक वीरेंद्र मंडलिक, सत्यजित पाटील, विश्वासराव कुराडे, आनंदराव फराकटे, कैलाससिंह जाधव, महेश घाटगे, भगवानराव पाटील, प्रदीप चव्हाण, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, डिस्टीलरी विभागप्रमुख विजय पाटील, प्रकाश कुंभार, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT