Urea Agrowon
ॲग्रो विशेष

Urea Use : युरियाचा औद्योगिक वापरासाठी विक्रीचा प्रकार उघड

Fertilizer : शेती वापरासाठी असणारा अनुदानित युरिया वेगळ्या बॅगमध्ये भरून औद्योगिक वापरासाठी विक्री केल्या जात असल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात कृषी विभाग व पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून पुढे आला आहे.

Team Agrowon

Beed News : शेती वापरासाठी असणारा अनुदानित युरिया वेगळ्या बॅगमध्ये भरून औद्योगिक वापरासाठी विक्री केल्या जात असल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात कृषी विभाग व पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून पुढे आला आहे.

याप्रकरणी मंगळवारी (ता. २२) अंभोरा पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे व बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

बीड जिल्हा परिषदेची खत निरीक्षक तथा मोहीम अधिकारी सयाप्पा गरंडे, तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) आशिष काळुसे, खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी एन. एस. राऊत यांच्या पथकाने अंभोरा पोलिसांच्या मदतीने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बीड-आहिल्यानगर रोडवर दक्षिण दिशेला असलेल्या घाटापिंपरी शिवार सर्वे नंबर १६, १७ तसेच सुलेमान देवळा येथील खंडोबा वस्ती परिसरात छापा मारून ही कारवाई केली.

शेतीच्या वापरासाठी असलेला युरिया दुसऱ्या बॅगेत पलटी मारून अनधिकृतपणे औद्योगिक वापरासाठी विक्री करत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतींचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

याप्रकरणी बीड जिल्हा परिषदेचे खत निरीक्षक तथा मोहीम अधिकारी श्री. गरंडे यांच्या तक्रारीवरून आबासाहेब चांगदेव शेळके मु. पो घाटापिंपरी (ता. आष्टी, जि. बीड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(२),(३),(४),२२३, ३४९ तसेच रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५ चे कलम ४, ५, ७, २२, २५ (३), ३५ सहकलम- अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम-३,७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतीसाठी उपयोगी युरियाची औद्योगिक वापरासाठी विक्री करणे नियमबाह्य आहे. असा प्रकार कुठे घडत असल्यास यंत्रणेला माहिती द्यावी. त्यामुळे खताच्या गैरप्रकाराला आळा घालण्यास मदत होईल.
- आशिष काळुसे, तंत्र अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather Alert: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; काही भागात पावसाची शक्यता

Well Subsidy Scheme: सरकारकडून नवी विहीर खोदण्यासाठी ४ लाख तर दुरुस्तीसाठी मिळणार १ लाख रुपये अनुदान; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

Farmer Demand: कर्जमाफीतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढा; अन्यथा दिवाळीत आंदोलन : लक्ष्मीकांत कौठकर

Drought Water Management: ‘मानवलोक’ने घेतला दुष्काळ मुक्तीच्या कामांचा वसा

Moringa in Drought: दुष्काळात शेवगा पीक ठरु शकते फायदेशीर

SCROLL FOR NEXT