River Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : खानदेशातील प्रमुख नद्यांचा प्रवाह थांबला

Khandesh River : खानदेशात यंदा अनेक सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यात काही प्रमुख नद्या डिसेंबर अखेरीसही प्रवाही होत्या.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा अनेक सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यात काही प्रमुख नद्या डिसेंबरअखेरीसही प्रवाही होत्या. पण आता प्रवाह थांबले असून, नद्यांतील पाणी आटू लागले आहे. प्रवाह बंद झाल्याने नद्यांतून वाळू उपसाही सुरू आहे.

यंदा पावसात तापी नदीला जुलैपासून प्रवाही पाणी होते. गिरणा नदीतही डिसेंबरमध्येही प्रवाही पाणी होते. तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर प्रकल्पातून अनेक दिवस पाण्याचा विसर्ग सुरू होता. गिरणा नदीवरील गिरणा धरणातून यंदा सप्टेंबरमध्ये विसर्ग सुरू झाला होता. नदीत डिसेंबरमध्येही पाणी होते.

जळगावातील वाघूर, कांग, सुकी, भोकर, गूळ, अंजनी आदी नद्यांतही पाणी होते. धुळ्यातील पांझरा, अनेर या नद्याही खळाळत होत्या. नंदुरबारातील सातपुड्यातील उदय, शहाद्यातील सुसरी, गोमाई नद्यांनाही प्रवाही पाणी होते. तसेच लहान-मोठे नाले, नद्यांतही पाण्याचा प्रवाह होता. कारण पाऊस ऑक्टोबरमध्येही झाला.

मागील हंगामात किंवा पावसाळ्यात अनेक नद्या कोरड्या होत्या. यंदा पाऊस चांगला असल्याने प्रकल्पांत सध्या जलसाठा ७६ टक्क्यांपर्यंत आहे. नदीमधील जलसाठ्याच्या आधारावर नदीकाठचे शिवार हिरवे होत आहे.

मागील वेळेस अनेक परंतु प्रमुख नद्या कोरड्याठाक पडल्या होत्या. यामुळे नदीकाठी काही दिवसातच टंचाई तयार झाली होती. अनेक गावांत जानेवारीतच टंचाई होती. नद्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. यंदा नद्या प्रवाही झालेल्या असतानाच रब्बी पिके, भाजीपाला, फळबागांसाठी सिंचनाची लगबग सतत सुरू आहे.

भूगर्भातील जलसाठा स्थिर आहे. कारण पाण्याचा उपयोग सध्या शिवारात सुरू नाही. तापी, गिरणा, पांझरा नदीतून पाणी प्रवाह बंद झाल्याने वाळू उपसा काही भागात सुरू आहे. कारण नदीत पाणी नाही. सध्या नदीमधील मोठे डोह, वाळू उपशामुळे तयार झालेले मोठे खड्डे यात पाणी आहे.

नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण झाले असून, जलसाठे मुबलक आहेत. गिरणा नदीत एकदा पाणी सोडले होते. यामुळे काही दिवसांपूर्वी गिरणा नदीत १० ते १५ दिवस प्रवाही होती. यंदा गिरणा, तापी, अनेर व पांझरा नदीकाठी टंचाई नसल्याची स्थिती आहे. गिरणातून रब्बीसाठी किंवा पिकांनाही पाणी मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: भू-विकास बँकेच्या पाच हजार १०६ शेतकऱ्यांचे कर्ज माफ

Agrowon Podcast: भेंडीला मागणीचा आधार; सोयाबीनचे भाव टिकून, कापूस बाजारात चढ-उतार, आल्याला उठाव टिकून तर कलिंगडाची आवक कमीच

Mayor Elections: महापौर निवडणुकांत भाजपची सरशी; आठ महापालिकांच्या चाव्या हातात 

Fodder Crisis: कोरडा चारा संपण्याच्या स्थितीत

Cashew Crop Inspection: काजू पिकावरील कीड-रोग प्रादुर्भावाची पाहणी सुरू

SCROLL FOR NEXT