Crop Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Damage : रब्बी ज्वारी, हरभरा पिकांचे मोठे नुकसान

Post Monsoon Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी (ता. ३०) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांत या दोन जिल्ह्यांतील काही मंडलांत तुरळक पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी (ता. ३०) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांत या दोन जिल्ह्यांतील काही मंडलांत तुरळक पाऊस झाला. अन्य मंडलांत ढगाळ वातावरण होते.

परंतु गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरादार पावसामुळे रब्बी ज्वारी, हरभरा आदी पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शेळगाव मंडलात ४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात पावसाची नोंद नाही. या दोन जिल्ह्यांत सोमवार (ता. २७) पासून वादळी वारे, विजाच्या कडकडात जोरदार पाऊस झाला.

नाले, नद्यांना आलेल्या पुराचे पाणी पीकात शिरले जमिनी खरडून गेल्या. अवकाळी पावसामुळे वाढीच्या अवस्थेतील रब्बी ज्वारी, हरभरा, भाजीपाला, फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यात ज्वारी, हरभरा या पिकांचे क्षेत्र अधिक आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच अंतिम बाधित क्षेत्र निश्‍चित होईल, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT