Maize Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Cultivation : खानदेशात मका पीक निसवले

Maize Sowing : खानदेशात मक्याची लागवड किंवा पेरणी यंदा वाढली आहे. लागवड सुमारे एक लाख ४० हजार हेक्टरवर झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मक्याची लागवड किंवा पेरणी यंदा वाढली आहे. लागवड सुमारे एक लाख ४० हजार हेक्टरवर झाली आहे. यातच पिकात अमेरिकन लष्करी अळीचा शिरकाव कायम आहे. शेतकरी फवारणी घेत आहेत. दोन महिन्यांच्या पिकात दोन-तीनदा फवारणी घेऊनही अळीचा अटकाव होत नसल्याने शेतकरी जेरीस आले आहेत.

मक्याची लागवड खानदेशात यंदा वाढली आहे. यंदा लागवड सुमारे ४० हजार हेक्टरने वाढली आहे. कारण खरिपात अतिपावसातील नुकसान व अन्य पिकांत फारशी संधी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये मक्यास पसंती दिली. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

खानदेशात गेल्या वर्षी रब्बी हंगामात मक्याची लागवड सुमारे ७५ हजार हेक्टरवर झाली होती. या हंगामातही लागवड स्थिर राहील, किंवा वाढू शकेल, असा अंदाज होता. अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मक्यावर खर्च वाढविला आहे.

दादर ज्वारी, संकरित ज्वारी, हरभरा या पिकांची पेरणी कमी झाली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी कापूस पीक काढून क्षेत्र रिकामे केले. त्यातही मका व गव्हाची पेरणी केली. अर्थातच मक्याची लागवड यंदा वाढली आहे.त्यात लागवडीनंतर पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप झाला आहे.

डिसेंबरअखेर व जानेवारीत लागवडीच्या मका पिकात शेतकरी कीडनाशकांची फवारणी घेत आहेत. दोन महिन्यांच्या पिकात तीनदा फवारणी घ्यावी लागली आहे. एकरी दोन हजार रुपये, एवढा फवारणीसाठी एकदा खर्च आला आहे. तरीदेखील अळीचा अटकाव झालेला नाही.

लष्करी अळीमुळे पिकाची वाढ खुंटत आहे...

पीक आता अनेक भागात निसवत आहे. नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या पिकात निसवण पूर्ण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्रात आता अळीचा प्रादुर्भाव अधिक आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. कुठेही शेतकरी मार्गदर्शन, पीक पाहणी झालेली नाही. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाने मध्यंतरी मार्गदर्शन कार्यक्रम राबविला.

परंतु स्वस्तातील किडनाशके, अनुदानित निविष्ठा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. कारण लष्करी अळीमुळे पिकाची वाढ खुंटत आहे. पिकाचे किमान २० ते २५ टक्के नुकसान या प्रादुर्भावाने झाले आहे. पोंग्यात अळीचे वास्तव्य आहे. पाने कुरतडलेली येत आहेत. पीक पिवळे पडत आहे. शेतकरी खते, सिंचन याबाबत कार्यवाही व्यवस्थित करीत आहे. परंतु अळीचा नायनाट होत नसल्याने शेतकरी जेरीस आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT