Maize, Onion Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : मका, कांद्याचे पीक बहरले

पीक सध्या बहरात आहे. या शिवाय काहींनी मका पीक घेतले. तेही पीक बहरात आहे. या पिकामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे.

Team Agrowon

Maize, Onion Crop Cultivation अंबड : तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी मका, कांद्याचे पीक (Maize, Onion Crop) घेतले. यंदा मुबलक पाणीसाठा (Water Shortage) असल्याने ही पिके जोमात आली आहेत. शिवाय आंबा (Mango) आणि मोसंबीच्या झाडांनाही चांगला मोहर लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यंदा शेतकऱ्यांनी बियाणे कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. तालुक्यातील मार्डी, शिरनेर, चिंचखेड, मठजळगाव, भिवंडीबोडखा, नांदी, नागझरी, धनगरपिंपळगाव, पारनेर, लालवाडी, डावरगाव, पावसेपांगरी, कवडगाव, झिरपी, ताडहादगाव, वलखेडा, ढालसखेडा, भालगाव, बोरी, मसई, दूधपुरी, दहीपुरी, सारंगपूर, वाघलखेडा, शेवगा, धनगरपिंपरी, हारतखेडा, हस्तपोखरी, कर्जत, लोणारभायगाव आदी गावांमध्ये बियाणा कांदाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

हेही पीक सध्या बहरात आहे. या शिवाय काहींनी मका पीक घेतले. तेही पीक बहरात आहे. या पिकामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे.

सध्या वातावरणात दिवसरात्र बदल होत आहे. ढगाळ वातावरणाबरोबर भल्या पहाटे धुकं पसरत आहे. यामुळे उभ्या पिकावर तसेच फळझाडावर विपरीत परिणाम होत आहे.
जगन्नाथ तिकडे, शेतकरी, शेवगा
सध्या जोमात आलेल्या मक्याच्या पिकांत रानडुकराचे टोळके धुमाकूळ घालून पिकांची नासाडी करीत आहेत. याचबरोबर अन्नपाण्याच्या शोधात हरीण, काळवीट या वन्यप्राण्यांचा वावरही वाढत चालल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
गोवर्धन उगले, शेतकरी, लालवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT