Milk Adulteration Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Adulteration : भोसेतील दूध भेसळ प्रकरणातील आरोपींना राजस्थानमधून अटक

Fake Milk Racket : भोसे (ता.पंढरपूर) येथील दूध भेसळ प्रकरणातील फरार असणाऱ्या चार संशयित आरोपींना पोलिसांनी खाटुबडी (राजस्थान), पुणे व अकलूज येथून अटक केली आहे.

Team Agrowon

Solapur News : भोसे (ता.पंढरपूर) येथील दूध भेसळ प्रकरणातील फरार असणाऱ्या चार संशयित आरोपींना पोलिसांनी खाटुबडी (राजस्थान), पुणे व अकलूज येथून अटक केली आहे. याबाबत आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, करकंब पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सागर कुंजीर यांना भोसे (ता. पंढरपूर) येथे भेसळ युक्त दूध तयार करून त्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी अन्न व औषध प्रशासन यांचे मदतीने २० फेब्रुवारी रोजी छापा टाकून कारवाई केली होती.

त्यावेळी मुख्य आरोपी दत्तात्रय महादेव जाधव (रा. भोसे, ता. पंढरपूर) याच्या मालकीच्या जागेतून कृत्रीम दूध बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी सचिन अरुण फाळके (वय ३१, रा. पांढरेवाडी, ता. पंढरपूर) यास आधीच अटक केली होती.

शिवाय इतर मुख्य आरोपी दत्तात्रय महादेव जाधव, त्याची पत्नी सोनाली दत्तात्रय जाधव (दोघे रा. भोसे, ता.पंढरपूर), अनिकेत बबन कोरके (रा. सुगाव भोसे ता. पंढरपूर) व पृथ्वीराज ऊर्फ सोन्या नवनाथ शिंदे (रा. पांढरेवाडी ता. पंढरपूर) हे फरार होते. गुन्ह्याचा पुढील तपास उप-विभागीय पोलिस अधिकारी डॉ. श्री.अर्जुन भोसले हे करत होते.

तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने मुख्य आरोपी दत्तात्रय जाधव व त्याची पत्नी सोनाली जाधव हे दोघे खाटुबडी (राजस्थान) येथे असल्याची माहिती मिळाल्याने पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रसाद आवटी, मोनिका पवार, शहाजी मंडले, यांनी तेथे जाऊन दोन्ही आरोपींना अटक केली.

तसेच सहायक पोलिस फौजदार शरद कदम, पोलिस हेड कॉन्स्टेबल सूरज हेंबाडे यांनी अनिकेत बबन कोरके यास पुणे येथून तर पृथ्वीराज शिंदे यास अकलूज येथून ताब्यात घेतले. सदर कारवाई करिता सायबर विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी तांत्रिक मदत केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT