Farmers Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Subsidy : विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान

Satara Farmers : जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकरी यामध्ये पात्र ठरले. त्यांना ८८० कोटी रुपये अनुदान मिळणार होते.

sandeep Shirguppe

Satara Farmers Subsidy : कर्जमाफीत न बसलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. यामध्ये सातारा जिल्ह्याला तब्बल ६९४ कोटींचे अनुदान मिळाले आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्याच्या वाटपात केवळ आधार कार्ड लिंक आणि प्रमाणिकरण राहिल्याने तब्बल १०५४ पात्र शेतकरी या लाभापासून वंचित होते.

या सर्वांना येत्या १५ दिवसांत आधारकार्ड प्रमाणिकरण करून घेण्याची सूचना सहकार विभागाने केली असून, त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी हे अनुदान खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.

शासनाने वेळेत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. या कर्जमाफीत काही शेतकरी बसले नव्हते. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकरी यामध्ये पात्र ठरले. त्यांना ८८० कोटी रुपये अनुदान मिळणार होते.

अनुदान वाटप टप्प्या टप्प्याने करण्यात आले. पहिल्या दोन टप्प्यांत काही अडचणी आल्या नाहीत. मात्र, त्यानंतर मृत आणि अपात्र लाभार्थी यामध्ये सापडल्याने शासनाने याची तपासणी केली. अपात्र लाभार्थी वगळले, तसेच ज्यांचा आधार कार्ड लिंक व प्रमाणिकरण झालेले नव्हते त्यांनाही प्रोत्साहन अनुदान मिळाले नव्हते. त्यानंतर याकडे शासनाचेही दुर्लक्ष झाले होते; पण आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा जिल्ह्यातील प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तब्बल १०५४ जणांना आधार कार्ड प्रमाणिकरण करण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यांचे आधार कार्ड प्रमाणिकरण झाल्यास त्यांना निवडणुकीच्या आधी हे अनुदान मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जिल्ह्याला प्रोत्साहन अनुदानातून ६९४ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे.

५ कोटी २७ लाख मिळणार

१०५४ शेतकऱ्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ७४७ उर्वरित ३०७ शेतकरी हे इतर राष्ट्रीयीकृत बॅंकेचे सभासद आहेत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ५ कोटी २७ लाख रुपयांची रक्कम जिल्ह्याला मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT