MPKV Rahuri Agrowon
ॲग्रो विशेष

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला युवक महोत्सवात दोन सुवर्णपदके

MPKV youth Festival : अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवक महोत्सवात महात्मा फुले कृषी विद्यापीठाला दोन सुवर्णपदके एक रजतपदक मिळाले आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवक महोत्सवात महात्मा फुले कृषी विद्यापीठाला दोन सुवर्णपदके एक रजतपदक मिळाले आहे. १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाल्याने महात्मा फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी विजेत्यांना एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘इंद्रधनुष्य २०२४’ राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवक महोत्सव झाला. या महोत्सवात कृषी व अकृषी असे एकूण २४ विद्यापीठातील संघ सहभागी झाले होते. एकोणीस वर्षात प्रथमच चारही कृषी विद्यापीठामधून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गोदा या एकांकिकेस सांघिक सुवर्णपदक मिळाले.

वैयक्तिक स्पर्धेत पाश्चिमात्य एकल गायनात तेजस कांबळे यास सुवर्णपदक तर क्षितिज जाधव यास ऑन दि स्पॉट फोटोग्राफीमध्ये रजतपदक मिळाले आहे. कुलगुरू डॉ पी.जी. पाटील यांनी सर्व विजेत्या व या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या ४५ कलाकार विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

पदव्युत्तर महाविद्यालयाच्या दृक श्राव्य सभागृहात इंद्रधनुष्यांच्या विद्यापीठ संघातील विजेत्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन व गौरव सोहळा झाला. डॉ. पाटील यांनी सर्व विजेत्यांना एक लाख रुपयांचे व एकांकीकेचे दिग्दर्शक मुंबई येथील अॅड. सागर गावंड व संगीत दिग्दर्शक कोल्हापूर येथील ॠतिराज रास्ते यांना १० हजाराचे बक्षिस जाहीर केले.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षण व संशोधनातून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खूपच कमी वेळ मिळतो. विद्यार्थी कष्ट घेऊन राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवतात हे स्वकष्टामुळेच शक्य होते.

याप्रसंगी डॉ. पाटील यांनी डॉ. महावीरसिंग चौहान यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यापीठाला सहाव्या वर्षी इंद्रधनुष्यासह कला, क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेत यश मिळाले. यावेळी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्षनाथ ससाणे, कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.

डॉ. महावीरसिंग चौहान यांनी आभार मानले. डॉ. भीमराव कांबळे, डॉ. विलास वाणी, डॉ अण्णासाहेब नवले, डॉ. बी.टी. पाटील, डॉ. पवन कुलवाल, डॉ. उल्हास सुर्वै, डॉ. सुनील भणगे, डॉ. गेठे, दापोली कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. माने, किरण शेळके उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT