Seed Certification Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Certification : ऑनलाइन बीज प्रमाणीकरणात महाराष्ट्र राज्य आघाडीवर

Seed Production : मॅन्युअली होणारी बियाणे प्रमाणीकरण प्रक्रिया वेळकाढू होती. त्यानंतर केंद्र सरकारने पुढाकार घेत ‘साथी’च्या (सीड ऑथॅन्टिकेशन ट्रेसेबिलिटी अँड होलेस्टिक इन्हेटरी) माध्यमातून बियाणे प्रमाणीकरणासाठीची सारी प्रक्रिया ऑनलाइन करण्यावर भर दिला.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : मॅन्युअली होणारी बियाणे प्रमाणीकरण प्रक्रिया वेळकाढू होती. त्यानंतर केंद्र सरकारने पुढाकार घेत ‘साथी’च्या (सीड ऑथॅन्टिकेशन ट्रेसेबिलिटी अँड होलेस्टिक इन्हेटरी) माध्यमातून बियाणे प्रमाणीकरणासाठीची सारी प्रक्रिया ऑनलाइन करण्यावर भर दिला. यामध्ये महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेने देशातील वीस प्रमाणीकरण यंत्रणांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे.

खात्रीशीर बियाण्यांचा पर्याय म्हणून महाबीजसह अनेक शेतकरी तसेच खासगी कंपन्यांद्वारे हंगामात बियाणे प्रमाणीकरण करून घेण्यावर भर राहतो. बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या चोख नियंत्रणात बियाणे प्रमाणीकरणाचे कामकाज होते. त्यामुळेच राज्यात देखील पारदर्शी कामकाजाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेने आपले वेगळेपण वारंवार सिद्ध केले आहे.

आता देशातील वीस प्रमाणीकरण यंत्रणांमध्ये पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेने सर्वांत आधी ऑनलाइन प्रणाली अंगीकारली आहे. त्या माध्यमातून प्रमाणीकरणाशी निगडित नोंदणी ते बिलिंग अशा विविध टप्प्यांवरचे कामकाम ऑनलाइन होते.

त्याकरिता केंद्र सरकारच्या साथी या संकेतस्थळाचा वापर होतो. शेतकऱ्याचे बीजोत्पादन क्षेत्र जितके असेल तितक्‍या क्षेत्राचा सात-बारा देखील नोंदणीनंतर ऑनलाइनस्तरावरच महसूलच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून घेतला जातो. अशा प्रकारचे अनेक बारकावे ऑनलाइन प्रक्रियेत जपले आहेत.

कार्यपद्धती संदर्भाने नियमावली

बियाणे प्रमाणीकरणाचे विविध टप्प्यांवर काम होते. त्याकरिता देशात सर्वांत आधी आणि प्रभावी अशी कार्यपद्धती महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेने निश्चित केली आहे. त्याचाच आधार घेत केंद्र सरकारने देशपातळीवरील बियाणे प्रमाणीकरण यंत्रणासाठी कार्यपद्धती संदर्भाने नियमावली तयार केली आहे. या कार्याबद्दल यंत्रणेचे विद्यमान संचालक विजय शिराळ यांचा तत्कालीन कृषी सचिव यांनी विशेष प्रमाणपत्र देत गौरव देखील केला आहे.

...असे आहे शुल्क

प्रमाणित ः २२५ रुपये प्रति एकर

ंडेशन ः ३०० रुपये प्रति एकर

गावस्तरावरील साठा पडताळणी ः साडेतीन रुपये प्रति पोते

प्रक्रिया केंद्रावर ः बियाणे प्रोसेसिंग ७५ रुपये प्रति क्‍विंटल

टॅग ः सात रुपये प्रति

माहितीसाठी करा क्‍यू-आर कोड स्कॅन

पूर्वी प्रमाणीत बियाण्याच्या टॅगवर केवळ उत्पादक संस्थेची माहिती नोंदविली जात होती. आता टॅगसोबत क्‍यू-आर कोड दिला जातो. तो स्कॅन करताच बियाणे सोर्स ते बीजोत्पादक, प्रक्रिया असा सर्व टप्प्यांवर सगळ्याच प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यावर बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

खरीप ७५ ते ८० हजार हेक्‍टर (सोयाबीन, तूर, मूग, उडीद) तर रब्बी ३० ते ३५ हजार हेक्‍टर (हरभरा, गहू) याप्रमाणे राज्यात बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. प्रमाणीकरणाच्या अनुषंगाने याचे संनियंत्रण राज्य बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेच्या माध्यमातून होते. सोर्स व्हेरिफिकेशनदेखील केले जाते. ही सारी प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.
- विजय शिराळ, संचालक, महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT