Rajaram Sugar Mill Election Result Agrowon
ॲग्रो विशेष

Rajaram Sugar Mill Election Result : राजाराम कारखान्यावर महाडिक गटाची सत्ता कायम; बंटी पाटलांचा कंडका पडला

Rajaram Sugar Mill Election Update : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे सुरूवातीच्या फेऱ्यातील निकाल जाहीर झाले आहेत.

Team Agrowon

Kolhapur Election News : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे (Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory Election) सुरूवातीच्या फेऱ्यातील निकाल जाहीर झाले आहेत. संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक (MLA Mahadevrao Mahadik) यांनी विजय मिळवला आहे. महाडिक यांना एकूण ८३ मते मिळाली आहेत. तर विरोधी पॅनेलचे उमेदवार सचिन पाटील (Sachin Patil) यांना ४४ मते मिळाली आहेत.

मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये सत्ताधारी महाडिक यांनी सुरुवातीपासूनच चांगली आघाडी घेतली होती. दरम्यान, निवडणुकीच्या पहिल्या फेरीत सत्ताधारी गटातील माजी आमदार अमल महाडिक हे एक हजार मतांनी आघाडीवर आहेत. या फेरीत विरोधी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या गटाला धक्का बसलाय.

दोन फेऱ्यांत मतमोजणीची प्रक्रिया संपणार आहे.

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चांगलीच गाजली. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. महाडिक यांच्या सत्तेला आमदार सतेज पाटील यांनी आव्हान दिले होते. ही निवडणूक वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनी गाजली.

गेल्या काही वर्षांपासून महाडिक आणि पाटील यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. महाडिक यांच्या ताब्यात असलेली एकेक सत्तास्थानावरून त्यांना हुसकावून लावण्यासाठी पाटील यांनी प्रयत्नांची शर्थ केली. जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतही पाटील यांच्या पॅनेलने महाडिक गटाचा पराभव केला.

कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हे केवळ एकच सत्ताकेंद्र महाडिक यांच्या ताब्यात उरलेले आहे. तिथेही महाडिक यांना धुळ चारण्यासाठी पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

आमदार सतेज पाटील यांनी कारखान्यावर निवडणूक लादली, पैशांचा वापर करून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मतदारांनी त्यांना धडा शिकवला, असे खा. धनंजय महाडिक म्हणाले. कारखान्याच्या निवडणूक निकालामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळेल, असे मत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT