Truthful seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Production : तीन हजार हेक्टरवर महाबीजचा बिजोत्पादन कार्यक्रम

Mahabeej : महाराष्ट्र राज्य बियाणे उत्पादक महामंडळाच्या (महाबीज) वतीने जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी बिजोत्पादन व विपणाचे चोख नियोजन केले आहे.

Team Agrowon

Latur News : महाराष्ट्र राज्य बियाणे उत्पादक महामंडळाच्या (महाबीज) वतीने जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी बिजोत्पादन व विपणाचे चोख नियोजन केले आहे. हंगामासाठी महाबीज सज्ज झालेअसून हंगामात सोयबीन, तूर, मूग व उडीद या पिकांचा तीन हजार १९० हेक्टरवर बिजोत्पादन कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे.

यात पोकरा योजनेत सहभागी गावांतही विविध कृषी विकास कार्यक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती महाबीज जिल्हा व्यवस्थापक एन. जी. इनामदार यांनी दिली.

महाबीजच्या वतीने दरवर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये विविध पिकांच्या विविध वाणाच्या पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो. जिल्ह्यातील लातुर, रेणापूर, चाकूर,औसा,निलंगा, अहमदपूर, उदगीर व शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये हा बीजोत्पादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला बिजोत्पादन आरक्षण योजनेचा कार्यक्रम सुरु झाला आहे. जिल्हातील लातूर व शिरूर ताजबंद या केंद्रावर बिजोत्पादनाचे आरक्षण घेणे सुरु आहे. यात सरकारच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा क्रमांक दोनमध्ये समाविष्ट गावांमध्ये महाबीजच्या वतीने विविध कृषी विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी पोकरा व महाबीजमध्ये सामंजस्य करार झाला आहे.

या योजनेचा लाभ जिल्हातील दहा तालुक्यातील २१६ गावांतील शेतकऱ्यांना होणार असून जिल्ह्यातील बिजोत्पादन क्षेत्राचा विकास होण्यास, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास व जमिनीच्या आरोग्य सुधारणा होण्यास निश्चित मदत होणार असल्याचे श्री. इनामदार यांनी सांगितले. खरिपातील बिजोत्पादन कार्यक्रमात सर्वाधिक सोयाबीनचा तीन हजार ६२ हेक्टर क्षेत्र, मूग १४ हेक्टर, तूर ३५ हेक्टर तर उडीद ७० हेक्टरवर ७० हेक्टरचा समावेश आहे.

यंदा नवीन व जुन्या वाणाचा बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिजोत्पादनात सोयाबीन JS-335, MAUS-71, DS-228, MAUS-612, MAUS-162मूग- फुले चेतक, तूर- गोदावरी, BDN-716, BDN-711 व उडीद- फुले वसु, AKU-10-1 व TAU-1या वाणांचा समावेश आहे. पोकरातील गावातील शेतकऱ्यांना बियाणे व बीजप्रमाणीकरण यंत्रणेची रक्कम बिजोत्पादनातील अंतिम बियाणे प्राप्त झाल्यानंतर परत दिली जाणार असल्याचे श्री. इनामदार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT