Kharif Season 2025  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Seed Production : खरिपाचा पाच हजार हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित

Kharif Season 2025 : महाबीज तर्फे (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२५) खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचा ४ हजार ९७१ हेक्टरवर बिजोत्पादन कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे.

Team Agrowon

Parbhani News : महाबीज तर्फे (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२५) खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचा ४ हजार ९७१ हेक्टरवर बिजोत्पादन कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा २.०) अंतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये विविध कृषी विकास कार्यक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. परभणी येथील केंद्रावर बीजोत्पादन आरक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे, अशी माहिती महाबीज जिल्हा व्यवस्थापक आर. आर. राठोड यांनी दिली.

महाबीजतर्फे दरवर्षी खरीप व रब्बी हंगामाध्ये विविध पिकांच्या विविध वाणांच्या पायाभूत व प्रमाणित बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो. यंदा परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, पूर्णा, पालम, सोनपेठ, पाथरी तालुक्यामध्ये या बीजोत्पादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला बीजोत्पादन आरक्षण योजनेचा कार्यक्रम सुरू झाला आहे. परभणी या केंद्रावर बीजोत्पादनचे आरक्षण घेणे सुरू आहे.

यात सरकारच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा २.०) मध्ये समाविष्ट गावामध्ये महाबीजतर्फे विविध कृषी विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी पोकरा व महाबीजमध्ये सामंजस्य करार झाला आहे.

पोकरातील गावातील शेतकऱ्यांना बियाणे व बीजप्रमाणीकरण यंत्रणेची रक्कम बीजोत्पादनातील बियाणे प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाकडून परत दिली जाईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील गावांतील शेतकऱ्यांना होणार असून जिल्ह्यातील बिजोत्पादन क्षेत्राचा विकास होण्यास, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास व जमिनीची आरोग्य सुधारणा होण्यास निश्चीत मदत होणार आहे.

यंदा नवीन व जुन्या वाणाचा बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जात आहे. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या बिजोत्पादन कार्यक्रमात सोयाबीन ः जेएस ३३५, एमएयुएस -७१, एमएयूस ६१२, एमएयुएस १५८, एमयूएस ७२५, एमएसीएस १४६०, सुवर्णसोया, फुले दुर्वा, राजसोया-२४, तूर ः बीडीएन-७१६, पीबीएनरेणुका, मूगः फुले चेतक, उत्कर्ष, बीएम-२००३-२, उडीद ः टीऐयू -१ या वाणांचा समावेश, असे राठोड यांनी सांगितले.

परभणी जिल्हा महाबीज खरीप २०२५ प्रस्तावित

बीजोत्पादन कार्यक्रम (क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक बीजोत्पादन क्षेत्र

सोयाबीन ४८९६

तूर २६

मूग ३४

उडीद १५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT