MVA Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Winter Session : हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष एकटवले, महायुती सरकारच्या चहापानावर बहिष्कार

Assembly Winter Session 2023 : उद्यापासून राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमवीर महाविकास आघाडीच्या नेत्यांची नागपूरमध्ये बैठक झाली.

Swapnil Shinde

Nagpur Winter Session : राज्याचे विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. गेल्या दीड वर्षात राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप झाले. शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या बंडानंतर पावसाळी अधिवेशन वादळी ठरले होते. दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी आज सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे.बहिष्कार घालण्यामागचे कारणही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विषद केले.

या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे आमदार उपस्थित होते.

विजय वड्डेटीवार म्हणाले की, एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असताना सरकारकडून दुष्कार जाहीर करण्यास विलंब होत आहे. पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने विमा कंपन्यांकडून अग्रीम रक्कम देण्यास टाळाटाळ होत आहे. तर दुसरीकडे गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक पंचनामे झाले नाही. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन आपली पाठ थोपटून घेत आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी वड्डेटीवार यांनी केली.

राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना सरकारने केवळ राजकीय हेतून प्रेरित होऊन ठराविक तालुक्याचा दुष्काळ सदृश्य तालुके म्हणून जाहीर केले आहेत. मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणातील गुंता वाढविण्याचे काम सरकारने केले आहे. यासाठी राज्यापुढील प्रश्न मोठे असताना चहापानाला जाणं उचित नाही, म्हणून आम्ही चहापानाला बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता”, असे वड्डेटीवार यांनी जाहीर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT