Lumpy  Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin : राज्यात ३७ हजार ६२८ जनावरे लंपीने दगावली; पशुपालकांना मदतनिधी दिल्याची विखेंची माहिती

राज्यातील लंपी स्कीन आजाराने दगावलेल्या जनावराच्या पशुपालकाला मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती.

Team Agrowon

Lumpy Skin : राज्यातील ३७ हजार ६२८ पशुधन लंपी स्कीन आजारामुळे दगावले आहे. राज्य सरकारने शंभर टक्के लसीकरण करण्यावर भर दिला आहे.

त्यामुळे लंपी स्कीन आजाराचा प्रसार आटोक्यात ठेवता आला, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

"राज्यात दीड कोटी पशुधन आहे. १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

राज्यातील ४ लाख ६९ हजार जनावरे लंपी बाधित होती. त्यापैकी ४ लाख २७ हजार बरे झाली. परंतू ३७ हजार ६२८ जनावरे लंपी स्कीन आजाराने दगावली," अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.

राज्यातील लंपी स्कीन आजाराने दगावलेल्या जनावराच्या पशुपालकाला मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती.

त्यामध्ये ७० कोटीची मदत पशुपालकांना करण्यात आली आहे, अशी माहितीही विखे यांनी दिली.

राज्यातील पशुपालक मदत निधी मिळत नसल्याची तक्रार करत आहेत.

लंपी स्कीन आजाराने दगावलेल्या जनावरांना मदतनिधी मिळत नसल्याचा आक्षेप विरोधीपक्षाने घेतला होता. त्यावर उत्तर देताना विखे बोलत होते.

राज्यातील १०० टक्के लसीकरण करून औषध खर्चासाठी राज्य सरकारने १०० टक्के निधी वेळेत उपलब्ध करून दिल्याची विखेंनी सांगितले.

देशातील राजस्थान, पंजाब राज्यात लंपी स्कीन आजाराने सर्वाधिक जनावरे दगावली आहेत.

परंतू महाराष्ट्र सरकारने लंपीला आटोक्यात ठेवण्यासाठी पावले उचलली, असा दावाही विखे यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’विरोधात ‘चक्का जाम’

Sugarcane Productivity : ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ’ अभियानास कोल्हापुरात प्रारंभ

Agriculture Irrigation : गतवर्षीच्या तुलनेत सिंचनासाठी १६ टीएमसीने उपसा कमी

SCROLL FOR NEXT