Agriculture Inputs  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs : कृषी निविष्ठा, उपकरणे खरेदीत राज्याला तोटा

Agriculture Department : खरेदी प्रक्रियेत राज्य शासनाला १४० कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.

Team Agrowon

Nagpur News : शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी राज्य शासन विविध कृषी निविदा, उपकरणे खरेदी करते. ती पुढे शेतकऱ्यांनाच दिली जातात. मात्र, या खरेदी प्रक्रियेत राज्य शासनाला १४० कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. शेतकरी उमेश भोळे (रा. सोनेगाव-बोरी, बोरखेडी, जि. नागपूर) यांनी ही याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पाच निविष्ठा, उपकरणांवर आक्षेप

याचिकेनुसार, राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी थेट लाभाच्या योजना राबविल्या जातात. या अंतर्गत त्यांना विविध निविष्ठा, उपकरणे तसेच अन्य सुविधा पुरविल्या जातात. त्यासाठी सरकार विविध निविष्ठा, उपकरणे खरेदी करते.

यातील निविष्ठा, उपकरणांवर या याचिकेतून आक्षेप घेतला आहे. या पाच निविष्ठा, उपकरणांत कॉटन स्टोअरेज बॅग, डीएपी, युरिया, मेटल डिहाईड, बॅटरी ऑपरेटेड उपकरणे यांचा समावेश आहे.

ही उपकरणे, निविष्ठा दोन संस्थांकडून खरेदी केली जातात. राज्यातील वितरणासाठी याच संस्थांकडून खरेदी होते. या संस्था या वस्तू चढ्या दरात विकतात. यामुळे हा तोटा होतो आहे. त्यामुळे ही खरेदी थांबवावी, अशी मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT