Sugarcane Season 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : लोकमंगल साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला प्रारंभ

Sugarcane Crushing Season : कारखान्याच्यावतीने दरवर्षी हंगामाचा प्रारंभ करण्यापूर्वी कारखाना कार्यस्थळावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. ह.भ.प. सुधाकरमहाराज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २४ वर्षापासून ही परंपरा सुरु आहे.

Team Agrowon

Solapur News : बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या २४ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ नुकताच ह. भ. प. सुधाकरमहाराज इंगळे यांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आला.

कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख, संचालक प्रशांत पाटील, सरव्यवस्थापक सुनील घालमे प्रशासकीय व्यवस्थापक विवेक पवार, शेती अधिकारी ज्ञानदेव मारकड, चीफ इंजिनियर प्रदीप काळे, चीफ केमिस्ट विजय यादव, डिस्टिलरी मॅनेजर यादव, मॅनेजर प्रवीण काळे, विशाल देशमुख, ब्रह्मदेव जाधव, राजू ननवरे, सचिन ननवरे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ह. भ. प. इंगळेमहाराज यांनी कारखान्याकडून शेतकऱ्यां प्रती दाखवला जाणार आदर आणि अध्यात्माला दिले जात असलेले महत्त्व याचे कौतुक केले. शेतकऱ्यांनीही या विश्वासाची परतफेड ऊस देऊन करा, असे आवाहन केले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनीही सभासदांच्या विश्वासामुळेच कारखाना प्रगती करतो आहे, असे सांगितले.

हरिनाम सप्ताहाने हंगामाची सुरवात

कारखान्याच्यावतीने दरवर्षी हंगामाचा प्रारंभ करण्यापूर्वी कारखाना कार्यस्थळावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. ह.भ.प. सुधाकरमहाराज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २४ वर्षापासून ही परंपरा सुरु आहे.

यंदाही ७ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत हा हरिनाम सप्ताह पार पडला आणि शेवटच्यादिवशी इंगळे महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि त्यांच्याच हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून हंगामालाही प्रारंभ करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT