Raju Shetti agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : 'साखर कारखानदारांच्या षडयंत्राला शेतकरीच अस्मान दाखवतील'

Sugar Factories : साखर कारखानदारांना माझ्या आंदोलनामुळे सहाशे कोटी रुपये शेतकऱ्यांना जादा द्यावे लागले.

sandeep Shirguppe

Lok Sabha Election 2024 : 'माझ्या विरोधात साखर कारखानदार बहुसंख्य उमेदवार देऊन षड्यंत्र करीत आहेत. मी माझा उमेदवारी अर्ज येत्या १५ एप्रिलला दाखल करणार असून, प्रस्थापित नेत्यांना या निवडणुकीत जनतेच्या बळावर अस्मान दाखविणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.

उदगाव (ता. शिरोळ) येथे कल्पवृक्ष गार्डनमध्ये आयोजित संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी शेट्टी म्हणाले, 'शिवसेनेने पक्षात येण्याची अट घातली होती. गेली ३० वर्षे मला जनतेने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. असे असताना मी गद्दारी करून शिवसेनेत कसा प्रवेश करू ? लोकसभा निवडणुकीत आमच्या विरुद्ध कारखानदार अशीच लढत होणार आहे.

साखर कारखानदारांना माझ्या आंदोलनामुळे सहाशे कोटी रुपये शेतकऱ्यांना जादा द्यावे लागले. त्याचा राग कारखानदार लोकसभेच्या निवडणुकीत काढत आहेत. सत्यजित पाटील यांची उमेदवारी हे त्यांचेच षड्यंत्र आहे. शेतकरी जोपर्यंत माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मला कशाची भीती नाही.

शक्तिपीठ महामार्गातून शेतकऱ्यांची २७ हजार हेक्टर जमीन संपादित करून त्यांना देशोधडीला सरकार लावत असेल तर मी हे सहन करणार नाही. सत्यजित पाटील व धैर्यशील माने हे साखर कारखानदारांचे हस्तक आहेत.'

याप्रसंगी लोकांनी २१ लाख ८० हजार रुपये लोकवर्गणी गोळा करून राजू शेट्टी यांना दिली. यामध्ये नांदणी गावाने ११ लाख रुपये दिले. यावेळी सावकर मादनाईक, वैभव कांबळे, पोपट मोरे, विठ्ठल मोरे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, जयकुमार कोले, शमशुद्दीन संदे, संदीप राजोबा, श्रीवर्धन पाटील, राम शिंदे, अण्णासो चौगुले उपस्थित होते.

...तर २०२९ ची निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही

इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाबाबत स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले, 'येत्या काळात इचलकरंजीचा पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्हाला २०२९ ची निवडणूक लढविण्याचा नैतिक अधिकार असणार नाही.'

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT