Animal Care  Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Census : नाशिकमध्ये मोबाईल अॅपद्वारे पशुधन गणना सुरू

Animal Care : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २१ व्या पशू गणनेच्या कामास सुरवात होणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री हस्ते पशुगणनेचा शुभारंभ झाला.

Team Agrowon

Nashik News : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २१ व्या पशू गणनेच्या कामास सुरवात होणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री हस्ते पशुगणनेचा शुभारंभ झाला. यात पशुगणना करणारे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहे.

जिल्ह्यामध्ये शहरी भागाकरिता १६५ व ग्रामीणमध्ये ३८४ प्रगणक सर्वेक्षण करणार आहेत. त्यांच्यावर पर्यवेक्षणाकरीता शहरी भागात २५ व ग्रामीण भागासाठी ८६ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे,पुढील पाच ते सहा महिन्यांपर्यंत सर्वेक्षण होणार आहे.

शहरी भागामध्ये चार हजार कुटुंब व ग्रामीण भागामध्ये तीन हजार कुटुंबामागे एक प्रगणक याप्रमाणे प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना या सर्वेक्षणात प्राधान्य दिले जाणार आहे. भटक्या कुत्र्याचीही मोजणी मोबाईल अॅपच्य माध्यमातून ही पशुगणना करण्यात येणार आहे.

यासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांना माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक घरी जाऊन या विकसित अॅपच्या माध्यमातून प्रगणक गणना करणार आहेत. त्यासाठी मोबाईल अॅपमध्ये प्राण्यांच्या २१९ प्रकाराच्या पशुधनाच्या जातींची गणना होणार आहे. प्रगणकांनी स्वतःच्या मोबाईल मधील अॅपद्वारे गणना करतील.

प्राण्यांची वर्गवारी, जात संदर्भातील छायाचित्रासह माहिती त्या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. गावातील, परिसरातील पाळीव कुत्रे, भटके कुत्र्यांची माहिती नोंदवली जाणार आहे. तसेच, दूध डेअरी, मटण व चिकन विक्रीच्या दुकानांसही त्यांच्याकडील माहितीची नोंद त्यामध्ये होणार आहे. पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचा डिप्लोमा किंवा पशुसंवर्धनाचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्रगणक म्हणून प्राधान्य देण्यात आले आहे.

स्थलांतरित पशूंची होणार गणना

२०१९ मध्ये झालेल्या २० व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यामध्ये ११ लाखांवर गायी, म्हशी, शेळी व मेंढ्या ८ लाख २३ हजार व १३,१५,७८५ कोंबड्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्थलांतरित स्वरूपाचा पशुपालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या अनेक पशूंचे मोजणी यापूर्वी झालेली नव्हती.

मात्र सुधारित मोबाईल ॲप मध्ये आता स्थलांतरित पद्धतीने पशुपालन करणाऱ्या व्यक्तींच्या पशूंची ही गणना केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण दिल्यानंतर पाच नोव्हेंबर पासून प्रत्यक्षात छत्री पातळीवर कामकाज सुरू होईल, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana MSP Registration: हरभरा नोंदणी १ मार्चपासून; हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नोंदणी आवश्यक

Unseasonal Rain: अवकाळी अन् गारपिटीचा तडाखा

Urad Bonus: उडदासाठी ६०० रुपये बोनस, मोहरीसाठी भावांतर योजना; मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

Chana Import Pressure on Prices: आयात तीनपट वाढली; हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा १५ ते १८ टक्क्यांनी कमी

Sugarcane Crushing Season: पाच जिल्ह्यांतील दोन कारखान्यांचा हंगाम आटोपला, २३ सुरू

SCROLL FOR NEXT