Fertilizer Management Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Management : खते वापरण्याची साक्षरता, व्यवस्थापन गरजेचे

Chemical Fertilizer : रासायनिक खतांचा वापर खूपच वाढलेला आहे. या वाढत्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे शेती, जंगल, पाणी आणि मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत.

डॉ. सोमिनाथ घोळवे

डॉ. सोमिनाथ घोळवे

Pesticide Update : रासायनिक खतांचा वापर खूपच वाढलेला आहे. या वाढत्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे शेती, जंगल, पाणी आणि मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. या संदर्भातील पुरेसा अभ्यास पुढे आलेला नाही किंवा त्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात नाही.

१९६० च्या दशकात अमेरिकेत वाढत्या रासायनिक खतांच्या वापराची दखल घेतली गेली. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या फेरविचार करण्याचे निर्देश ‘नॅशनल रिसोर्सेस कौन्सिल’ला तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी दिले होते.

यावर सखोल सर्वेक्षण, संशोधन आणि चिंतन करून रासायनिक, औद्योगिक शेती, उत्पादन पद्धतीला आळा घालून कमीत कमी बाह्य निविष्ठांच्या आधारे शाश्‍वत शेतीची शिफारस केली.

आज आपल्याकडे काय दिसते? रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर किती वाढवला आहे? दिवसेंदिवस रासायनिक खते आणि कीटकनाशके वापराची आकडेवारी वाढत जाणारी आहे.

त्यात अलीकडे विविध टॉनिक वापरण्याची शिफारस करणाऱ्या कंपन्यांनी धुमाकूळ घातला आहे. आपले शेतीशास्त्रज्ञ, नियोजनकार आणि धोरणकर्ते हे कोणत्याही मार्गाने उत्पादन वाढीच्या मागे लागले आहेत. रासायनिक खतांच्या वापरला विरोध करता येत नाही.

पण रासायनिक खते मातीचे परीक्षण करूनच वापरावेत. जेणेकरून मातीतील सुपीकता कमी होणार नाही आणि उत्पादनात घसरण होणार नाही. या संदर्भात शासकीय पातळीवर पुढाकार घेणे गरजेचे आहे.

खते वापरण्याच्या पद्धती आणि व्यवस्थापन विकसित करणे गरजेचे आहे. आपल्याकडे खते वापरण्याची साक्षरता आणि व्यवस्थापन पुरेसे आले नाही. कोणत्या पिकांना कोणते खत द्यावे याविषयी पुरेशी साक्षरता नाही.

२०२२ च्या खरीप हंगामात मी माझ्या गावातील (मुंडेवाडी, ता. केज, जि. बीड) सोयाबीनच्या पिकाला युरियाचे तीन-तीन डोस देताना शेतकरी पाहिले आहेत. हे डोस का? तर सोयाबीनची वाढ चांगली आणि हिरवीगार होण्यासाठी.

शेतकऱ्यांनी पिकाला माती तपासणी अहवालाप्रमाणे खताची मात्रा दिली पाहिजे. प्रमाणापेक्षा अधिक खत दिले तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पिकांना भासून उत्पादन घटते. रासायनिक खतांसोबत कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खत (बायोफर्टिलायझर्स), नॅनो युरिया यांचाही वापर आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT