Murghas Making Agrowon
ॲग्रो विशेष

Murghas Making : मालेगावात शेतकऱ्यांना मुरघास निर्मितीचे धडे

Grass Production : रब्बी हंगामानंतर जनावरांना हिरवा चारा मिळण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून दुधउत्पादक शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून पिशवीतील मुरघास बनविण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्र मालेगावमार्फत करण्यात आले.

Team Agrowon

Nashik News : मालेगाव तालुक्यातील बहुतांश भागात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प स्वरूपाचे होते. थोडाबहुत हिरवा चारा उत्पादन झाले असले तरी पुढील परिस्थिती पाहता अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे रब्बी हंगामानंतर जनावरांना हिरवा चारा मिळण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून दुधउत्पादक शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून पिशवीतील मुरघास बनविण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्र मालेगावमार्फत करण्यात आले. बहुतांश शेतकऱ्यांना मुरघास बनवण्याचे तंत्रज्ञान अवगत नसल्याने कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण कार्यक्रम व पद्धत प्रात्यक्षिके घेण्यात आले.

प्रशिक्षण कार्यक्रम व पद्धत प्रात्यक्षिक यावरच अवलंबून न राहता दूध उत्पादकांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्ह्यात ‘आत्मा’मार्फत राज्याच्या कृषी विस्तार योजनांना विस्तारविषयक सुधारणांकरिता सहाय्य योजनाअंतर्गत केविके मालेगावमार्फत तालुक्यातील कुकाने व डाबली येथे ‘पिशवीतील मुरघास बनविण्याचे प्रात्याक्षिक’ घेण्यात आले.

प्रात्यक्षिकांपर्वी गावातील शेतकऱ्यांचे, त्यांच्या शेती व कृषीपूरक व्यवसाय यानुसार सर्वेक्षण करण्यात आले. निवड केलेले बहुसंख्य शेतकरी हे दूध उत्पादक असून गावात दूध संकलन केंद्र आहेत. पिशवीतील मुरघास बनविण्याच्या प्रात्याक्षिकासाठी दोन्ही गावांतील ५० दूधउत्पादक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.

मुरघास बनविण्यासाठी आवश्यक संपूर्ण साहित्याचे वाटप करण्यात आले. यात मुरघास तयार करण्याची पिशवी, क्षार मिश्रण, मुरघास कल्चर व चारा उत्पादनासाठी संकरीत नेपियर बेणे वाटप करण्यात आले.

मुरघास बनविण्याचे प्रशिक्षण केंद्राचे पशु विज्ञान व दुग्धशास्त्र विषय विशेषज्ञ संदीप नेरकर यांनी घेतले. केविकेचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ अमित पाटील यांनी शेतकऱ्यांनी मुरघास बनवावा, असे आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

SCROLL FOR NEXT