Parbhani Hingoli Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon News : परभणी-हिंगोलीतील ७९ मंडलात १०० मिमीपेक्षा कमी पाऊस

Rain Update : यंदाच्या (२०२३) पावसाळ्यात गुरुवारी (ता. २९) सकाळ पर्यंत परभणी जिल्ह्यातील ५२ पैकी गंगाखेड, महातपुरी, माखणी या ३ मंडलामध्ये १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Parbhani Rain Update : यंदाच्या (२०२३) पावसाळ्यात गुरुवारी (ता. २९) सकाळ पर्यंत परभणी जिल्ह्यातील ५२ पैकी गंगाखेड, महातपुरी, माखणी या ३ मंडलामध्ये १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उर्वरित ४९ मंडल तसेच हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलात अशा एकूण ७९ मंडलात अद्याप १०० मिलीमीटरहून कमी पाऊस झाला.

पुरेशा ओलाव्याअभावी बहुतांश मंडळातील खरिपाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कपाशी, हळद या पिकांची लागवड सुरु केली आहे.

दरम्यान, या दोन जिल्ह्यातील जिल्ह्यातील ७० मंडलात गुरुवारी (ता. २९) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील ४९ मंडलात हलका ते मध्यम पाऊस झाला. बुधवारी (ता. २८) सायंकाळी व रात्री अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस झाला.

परभणी, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, पूर्णा तालुक्यातील काही मंडळात काहीवेळ जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११.२ मिमी तर जून मध्ये आजवर एकूण सरासरी ५३.६ मिमी (३८.१ टक्के ) पाऊस झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होता. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यातील २१ मंडलात हलक पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये)

परभणी जिल्हा - परभणी १०.८, पेडगाव १२.८, झरी ८.३, सिंगणापूर २६.६, दैठणा १०, पिंगळी २१.३, टाकळी कुंभकर्णी ९, बोरी ९, दूधगाव ८.३,सेलू ६.८, देऊळगाव २८.३, वालूर ३१.५, कुपटा १८.८, चिकलठाणा ९.३, मोरेगाव ९.८, मानवत १२, केकरजवळा २९.८, कोल्हा २७, ताडबोरगाव १०.८, पाथरी २४.३, बाभळगाव २१, हादगाव १६.८, कासापुरी ३१.५, आवलगाव ९.५, गंगाखेड ११.५, महातपुरी ६.५, माखणी १७, पिंपळदरी ९.८, बनवस १०.३, रावराजूर ६.३, पूर्णा ९.८, ताडकळस १२, लिमला १७, चुडावा ७, कावलगाव ७, हिंगोली जिल्हा ः वसमत ५.८, हयातनगर ५.८, साळणा ५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

US India Trade Tension: अमेरिकेचा दबाव भारत झुगारणार का?

Wild Vegetables: पुरंदर किल्ल्याच्या परिसरात बहरल्या रानभाज्या

Urea Data Mismatch: पावणेतीन लाख टन युरियाचा हिशेब लागेना

Monsoon Heavy Rain: मुसळधार पाऊस, पूरस्थितीचा फटका

Maharashra Monsoon Weather: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT