Monsoon  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : परभणी, हिंगोलीतील सात मंडलांत कमी पाऊस

Rain Update : ८२ पैकी ३४ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून त्यात १०० मिमी पेक्षा कमी पाऊस झालेल्या ७ मंडलांचा समावेश आहे.

माणिक रासवे

Parbhani News : जून महिन्यात परभणी जिल्ह्यात सरासरी १४५.३ मिमी पाऊस अपेक्षित आहे परंतु यावर्षी (२०२४ ) प्रत्यक्षात १७०.४ मिलिमीटर (११७.३टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी १६९.२ मिमी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात सरासरी १४९.८ मिमी (८८.५ टक्के) पाऊस झाला. यंदाच्या जून मध्ये परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा २५.१० मिमी जास्त तर हिंगोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा १९.४ मिमी कमी पाऊस झाला. या दोन जिल्ह्यातील ८२ पैकी ३४ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून त्यात १०० मिमी पेक्षा कमी पाऊस झालेल्या ७ मंडलांचा समावेश आहे.

परभणी जिल्ह्यात जून महिन्यात २०२० ते २०२४ या ५ पैकी २ वर्षी सरासरीपेक्षा कमी तर ३ वर्षात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. यंदाच्या जूनमध्ये जिल्ह्यातील ५२ पैकी १४ मंडलात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला तर त्यात १०० मिमीपेक्षा पाऊस झालेली पिंगळी, वालूर, कावलगाव हि ३ मंडले आहेत.सर्वात कमी कावलगाव (ता. पूर्णा) मंडलामध्ये ६५ मिमी (६४.३ टक्के) तर सर्वाधिक ताडबोरगाव (ता. मानवत) मंडलामध्ये २५४.८ मिमी (१९६.८ टक्के) पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी जून मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मागील ५ पैकी ३ वर्षी सरासरीपेक्षा कमी तर २ वर्षी जास्त पाऊस झाला. यंदाच्या जूनमध्ये जिल्ह्यातील ३० पैकी २० मंडलात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात १०० मिमी पेक्षा कमी पाऊस झालेली आखाडा बाळापूर, डोंगरकडा, गिरगाव, कुरुंदा हि ४ मंडले आहेत. सर्वात कमी पाऊस गिरगाव (ता. वसमत) मंडलामध्ये ८१.८ मिमी (५०.४ टक्के) तर सर्वाधिक सिरसम (ता. हिंगोली ) मंडलामध्ये २३१.७ मिमी (१३४.४ टक्के) पाऊस झाला आहे.

जून महिन्यातील तुलनात्मक पाऊस स्थिती (मिमीमध्ये)

परभणी जिल्हा :

वर्षे सरासरी प्रत्यक्ष पाऊस टक्केवारी

२०२० १४५.३ १९६.८ १३५.४

२०२१ १४५.३ २५०.५ १७२.४

२०२२ १४५.३ १३७.४ ९४.६

२०२३ १४५.३ ५५.५ ३८.२

२०२४ १४५.३ १७०.४ ११७.३

हिंगोली जिल्हा :

वर्षे सरासरी प्रत्यक्ष पाऊस टक्केवारी

२०२० १६९.२ २३५.४ १३९.१

२०२१ १६९.२ २५१.६ १४८.७

२०२२ १६९.२ १२१.७ ७१.९

२०२३ १६९.२ ४५.१ २६.७

२०२४ १६९.२ १४९.८ ८८.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT