Leopard Attack  agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Terror : वैराग भागात बिबट्याची दहशत कायम

Leopard Attack : वैराग भागात आठवडाभरापासून बिबट्याची दहशत आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Solapur News : वैराग भागात आठवडाभरापासून बिबट्याची दहशत आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैराग, जवळगाव नंतर सोमवारी (ता. २०) रात्री सारोळे येथे बिबट्या दिसला.

तर जामगाव पा. येथे पुन्हा मंगळवारी (ता. २१) पहाटे त्याने बैलावर हल्ला केला. परंतु दुसरीकडे वनविभागाच्या पथकाने मात्र जामगाव येथे घटनास्थळी भेट दिली आणि तो बिबट्या नसल्याचे सांगितले.

सारोळे (ता. बार्शी) येथील शेतकरी अशोक गाटे हे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शेतात पाणी देण्यासाठी गेले असता ५० फूट अंतरावर मोटर सायकलच्या उजेडात बिबट्या त्यांना उभा राहिलेला दिसला. त्यानंतर शेजारील शेतकऱ्याला बोलावले असता बिबट्या अंधारात पुढे कासारी गावच्या दिशेने निघून गेल्याचे पाहिले, असे त्यांनी सांगितले.

आमच्या गावातील अशोक गाटे यांना सोमवारी रात्री शेतात पाणी द्यायला गेल्यावर त्यांना बिबट्या आढळून आला. त्यामुळे आमच्या गावातील लोक भयभीत झालेले आहेत. तरी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी लाइट द्यावी.
-बाळराजे घाटे, माजी सरपंच, सारोळे
जामगाव येथील घटनास्थळी मंगळवारी सकाळी भेट दिली असता, बिबट्याने हल्ला केल्याबाबत बैलावर नख्याचे ओरबडलेले चिन्ह, अथवा त्याच्या पायाचे ठसे कुठेही आढळून आले नाहीत . त्यामुळे बिबट्याने हल्ला केला नसावा. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
-सचिन पुरी, वनपाल, वनविभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry Crisis: साखर उद्योगाला गरज कडू मात्रेची !

Monsoon Heavy Rain: पावसाचे देशभरात १२ बळी

Grape Farming Fund: द्राक्षशेतीला निधी देण्यास आढेवेढे घेणार नाही: उपमुख्यमंत्री पवार

Goat Farming: दोन शेळ्यांच्या बळावर बसविली आर्थिक घड

Snehanvan: ‘स्नेहवन’कडे पाहून जगण्याची उमेद वाढली

SCROLL FOR NEXT