Leopard  Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Terror : पंढरपूर तालुक्यात बिबट्यांचा वावर

Leopard Death : मागील चार दिवसांपूर्वी दसूर (ता. माळशिरस) येथे एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Team Agrowon

Solapur News : पंढरपूर तालुक्यात सध्या अनेक भागात बिबट्यांचा वावर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. बिबट्यांचा शोध घेऊन त्यांना राखीव जंगलात सोडावे; तसेच दसूर येथील बिबट्याच्या अपघाताची चौकशी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केली आहे. श्री. पाटील यांनी नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांना लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

मागील काही वर्षांपासून पंढरपूर भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. मागील चार दिवसांपूर्वी दसूर (ता. माळशिरस) येथे एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दोन ते तीन बिबटे केसकरवाडी (ता. पंढरपूर) परिसरात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अन्य भागात देखील बिबट्याची चर्चा अधूनमधून होते. वनविभागाने तातडीने बिबट्यांना पकडून त्यांना राखीव जंगलात सोडावे आणि दसूर येथील बिबट्याच्या अपघाताची चौकशी करावी, अशी मागणी श्री. पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

बिबट्यांचा मानवी वस्तीमध्ये शिरकाव

मागील महिन्यापूर्वी पळशी, उपरी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. या बिबट्याने पळशी येथील शेतकऱ्यांच्या जनावरांचा फडशा पाडला होता. त्यानंतर आता पुन्हा बिबट्याची चर्चा सुरू झाली आहे.

सध्या या भागात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. त्यामुळे बिबट्याचा मानवी वस्तीमध्ये शिरकाव झाला आहे. चार दिवसांपूर्वी दसूर येथे चार बिबटे एकाच वेळी रस्त्यावर आले होते. त्यामधील एकाचा अपघाती मृत्यू झाला तर अन्य तीन बिबटे केसकरवाडी, भाळवणी, शेंडगेवाडी परिसरात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT